‘..तर मी एका मिनिटांत राजकारण सोडेल’; भाजप सोडल्यानंतर खडसेंचे मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राज्यातील भाजप नैतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. ‘माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले अशा पक्षात जात असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली. पण कोणत्याही राजकीय पक्षाने माझ्यावर टीका केली नसून कोणीही राजीनाम्याची मागणी केली नव्हती. चौकशीचीही मागणी केली नव्हती. तुम्ही रेकॉर्ड तपासा असं विधान असेल तर मी एका मिनिटांत राजकारण सोडेल’ असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे. (eknath khadse first reaction after resign bjp jalgaon eknath khadse ncp)

‘आज मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेले 40 वर्ष भाजपचं काम करत होतो. या 40 वर्षात अनेक प्रसंग आले. भाजप खेड्यापाड्यात पोहोचलेली नव्हती. भाजप उपेक्षित होती, त्यावेळपासून आजतागायत भाजप पक्षाचं काम प्रामाणिकपणे करत आलो. भाजपनेदेखील या कालखंडात मला मोठ्या प्रमाणात राजकारणात अनेक पदं दिली. ते मी नाकारु शकत नाही. भाजपबद्दल माझ्या मनात कोणताही रोष नाही. मी भाजपच्या कोणत्या केंद्रीय नेत्यावर किंवा पक्षावर टीका केली नाही.’ असंही यावेळी एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी छळले

भाजप सोडताना खंत आहे. मला पक्षातून ढकलून लावलं. काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, फडणवीसांनी मनस्ताप दिला असं एकनाथ खडसे म्हणाले. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांना गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला, असंही खडसे म्हणाले.

गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकरांसारखे कितीतरी नेते होते, त्यांच्यासोबत आजतागातयत भाजपचं काम केलं. भाजपने मला अनेक मोठी पदं दिली, मी ती नाकारु शकत नाही. मी भाजपवर किंवा केंद्रातील नेत्यावर टीका केली नाही, असं खडसे म्हणाले. माझ्यासोबत एकही आमदार, एकही खासदार नाही. रक्षाताईंनी भाजप सोडणार नाही असं सांगितलं आहे, त्यांचा निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम आहेत, असं खडसे म्हणाले.

मला राष्ट्रवादीने कोणतंही आश्वासन दिलं नाही. मंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीच सांगू शकेल. मला पदाची अपेक्षा नाही. माझ्या ताकदीने मी पदं मिळवली आहेत. सहकारातून मिळवलं आहे, असं खडसे म्हणाले.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment