पुन्हा एकदा खडसे पवारांच्या भेटीला; राष्ट्रवादी प्रवेशावर नवाब मलिक म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
टीम, HELLO महाराष्ट्र। भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे मागील काही दिवसानापक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी वारंवार जाहीर पणे बोलूनही दाखवली आहे.दिल्लीत शारदा पवारांची भेट घेतल्यानंतर १२ तारखेला गोपीनाथगडावर झालेल्या मेळाव्यात खडसेंनी एक सूचक विधान केलं होत. त्यांनतर ते भाजपला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगात आहेत. त्यात आता पुन्हा खडसेंनी पवारांची भेट घेतल्याने या चर्चानी जोर धरला आहे.
मी ज्यांच्या बोटाला धरून राजकारणात आलो तो गोपीनाथ मुंडे नावाचा आधारवड माझ्या आयुष्यात असता तर माझ्यावर अन्याय झाला नास्ता अशा शब्दात खडसेंनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. भाजपला महाराष्ट्रात उभे करण्यात खडसेंचाही वाटा आहे. मागील ४५ वर्षाहून अधिक काळ ते भाजपात सक्रिय आहेत. मात्र गेल्या ५ वर्षात खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत.  पक्षासाठी इतका संघर्ष करुनही माझ्यावर अन्याय झाला अशी भावना एकनाथ खडसेंनी वारंवार बोलून दाखविली आहे.
सध्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असून, त्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे नागपूर मुक्कामी आहेत. यावेळी एकनाथ खसडेंनी पुन्हा एकदा पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का असा प्रश्न विचारला जात आहे. ‘एकनाथ खडसे भाजपवर नाराज आहेत. पण त्यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय अद्याप झाला नसल्याची’ माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.