भाजप नव्हे तर फडणवीस टीमवर नाराज – एकनाथ खडसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नेवासा प्रतिनिधी | भाजप नेते एकनाथ खडसे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा गेली अनेक दिवस झाले सुरु आहेत. रोहिणी खडसे यांच्या पराभवामुळे खडसे पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र आता आपण पक्षावर नाही तर पक्षातील फडणवीस टीमवर नाराज असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. नेवासा येथे पत्रकारांशी खडसे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

मला भाजपने खूप काही दिले आहे. मी पक्षावर नाराज नाही. गेल्या पाच वर्षांपासून पक्षाकडून नव्हे तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमकडून माझ्यावर अन्याय होत आहे, असा आरोप खडसे यांनी यावेळी केला.

दरम्याम भाजपवर नाराज नसून पक्षातील फडणवीस यांच्या टीमवर नाराज असल्याचे सागत वेळ आल्यावर मनातील रोष व्यक्त करणार आहे अशी भावनाही भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी येथे यावेळी व्यक्त केली.