गोपीनाथ मुडेंनी संघर्ष करून भाजपचा विस्तार केला पण पंकजा मुंडेंना तिकीट नाकारलं हे दुर्दैवी ; एकनाथ खडसेंची टीका

Eknath Khadse Pankaja Munde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील भाजपच्या प्रमुख ओबीसी चेहऱ्यांपैकी एक असलेल्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे भाजप विरोधात मुंडे समर्थकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आता भाजपवर निशाणा साधला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही या मुद्द्यावरून टीका ऍकेलिओ असून “महाराष्ट्रात भाजप हा मारवाडी आणि ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखला जात. ज्या गोपीनाथ मुंडेंनी भाजपला महाराष्ट्रात ओळख प्राप्त करून दिली आज त्यांच्या मुलीला भाजपने विधान परिषदेची उमेदवारी नाकारणे हे दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे, असे खडसे यांनी म्हंटले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर खडसेंनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज जे काही महाराष्ट्रात भाजपचे स्थान आहे, त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांनी संघर्ष करून महाराष्ट्रात भाजपचा पाया रुजवला, पक्षाचा विस्तार केला. याउलट ज्यांनी पक्षासाठी काहीच केले नाही, ज्यांचं काही योगदान नाही, अशा लोकांना उमेदवारी भाजपने दिली असून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिलेली नाही. ज्यांनी आपले उभे आयुष्य पक्षासाठी खर्ची केले, त्यांना बाजूला ठेवले जाते, असा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला.

शरद पवारांनी मला संकटाच्या काळात साथ दिली

राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्याबद्दल एकनाथ खडसे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचे आभार मानले. भाजपमध्ये मला अडगळीत टाकण्यात आले होते. अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने व शरद पवार यांनी मला साथ दिली. त्यामुळे आता विधानपरिषदेची निवडणूक जिंकल्यानंतर माझे राजकीय पुनर्वसन करणाऱ्यांशी प्राामाणिक राहणे, ही माझी भूमिका असेल, असे खडसे यांनी म्हटले.