हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदा उशिरा का होईना पण मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. काल दिवसभरात राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचे दिसलं. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची तर पहिल्याच पावसात दाणादाण उडाली आहे. संपूर्ण मुंबईची तुंबई झाली असून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता अरे बाबांनो, पावसाचं स्वागत करा अस अजब उत्तर त्यांनी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता त्यांना पहिल्याच पावसात तुंबलेल्या मुंबईबाबतचा प्रश्न पत्रकारांनी केला. मात्र यावर उत्तर देताना, अरे बाबा, पाऊस झालं याचं स्वागत करा. पाणी साचलं हे काय. पाऊस झाला त्यावर बोलत नाहीत अस अजब विधान शिंदे यांनी केलं. तसेच मूळ प्रश्नाला बगल दिली.
आज पाऊसाची चांगली सुरुवात झाली आहे. बळीराजा आणि आपण सगळे त्याचं आनंदाने स्वागत करुया. आपण सर्व गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाटत पाहत होतो. आज पाऊस चांगला सुरू झाला आहे. राज्यभर पेरण्या झाल्या आहेत. आजचा पाऊस शेतकऱ्यासाठी अतिशय उत्तम आहे. पाऊस झाल्याने सर्वांनाच मनापासून आनंद झाला आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी म्हंटल.