आमदार आमच्या संपर्कात असणारे सांगणारे एकही नाव सांगू शकले नाही; एकनाथ शिंदेंचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली असून अधिवेशनात राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. आता महाराष्ट्रात शिवसेना व भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. एका बाजूला मोठमोठे भाजप नेते तर दुसरीकडे बाळासाहेबांचा शिवसैनिक होता. माझ्याबरोबर आठ मंत्री सत्तेतून पायउतार झाले. आमदारांना अनेक प्रलोभन दाखवली पण 50 जण एकत्र आले आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. आमच्या संपर्कात आमदार असणारे सांगणारे एकही आमदाराचे नवा सांगू शकले नाहीत, असे म्हणत शिंदे यांनी शिवसेनेला टोला लगावला.

विशेष अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली. यावेळी अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. तसेच अभिनंदनही केले. यावेळी ते म्हणाले की, एकीकडे सत्ता, मोठे नेते आणि दुसरीकडे बाळासाहेबांचा शिवसैनिक, दिघे साहेबांचा सैनिक होता. पण ५० विधानसभा सदस्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला हे आमचे भाग्य आहे. एका आमदाराला मी स्वत: चार्टर्ड विमानाने पाठवलं. त्यामुळे कोणावरही जबरदस्ती झालेली नाही.

Vidhansabha Adhiveshan Live | शिंदे-फडणवीस सरकारची आज पहिली अग्निपरीक्षा

विधानभवन लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. अध्यक्षांची उच्च परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. अनेकांना यानंतर मोठी संधी प्राप्त झाली आहे. देशपातळीवरही त्यांना गौरवण्यात आलं आहे. सर्वोच्च पदावर विराजमान होत असताना फक्त राज्यातील नव्हे तर देशातील आणि परदेशातील लोक हा ऐतिहासिक क्षण डोळे भरुन अनुभवत आहेत. नार्वेकर हे कालपर्यंत कुलाबा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. पण आता व्यक्तिमत्वाला या न्यायालयातील शिरपेच मिळाला आहे. या पदाचा, मान, सन्मान, दर्जा मोठा आहे. ता आदींच्या अध्यक्षांनीही अनमान वाढवला आहे. कुणालाही झुकत माप देण्याच्या आमच्या अपेक्षा नाही.

Leave a Comment