व्यक्तिवेध । अक्षय पाटील
शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि भाजपसोबत सत्तास्थापन करून शिंदेंनी (Eknath Shinde) थेट मुख्यमंत्री पद मिळवलं. कडवट शिवसैनिक, कट्टर हिंदुत्ववादी अशी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची खरी ओळख. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपला राजकीय प्रवास सुरु केला आणि आज ते थेट मुख्यमंत्री पदापर्यंत पोचले आहेत. चला जाणून घेऊया एकनाथ शिंदे यांचा आजपर्यंतचा जीवनप्रवास. (Eknath Shinde Biography in Marathi)
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मूळचे साताऱ्याचे… 4 फेब्रुवारी 1964 रोजी जावळी तालुक्यातील दरे या गावी त्यांचा जन्म झाला. पण लहानपणीच त्यांनी गाव सोडलं आणि ठाण्यात स्थायिक झाले. ठाण्यातच त्यांचं शिक्षण पूर्ण झाले. एकनाथ शिंदे यांना एका अपघातात 11 वर्षांचा मुलगा आणि 7 वर्षांची मुलगी गमावली. त्यावेळीत्यांचा दुसरा मुलगा श्रीकांत शिंदे 13 वर्षांचे होते. श्रीकांत शिंदे हे आज शिवसेनेचा खासदार आहेत.
सुरुवातीच्या काळात ठाण्याच्या प्रसिद्ध वागळे इस्टेटमधील एका माशांचा कंपनीत सुपरव्हायझर म्हणून काम करणारे एकनाथ शिंदे हे नंतर ठाण्यात ऑटो रिक्षा चालवू लागले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आनंद दिघे यांचा सहवास लाभला आणि शिंदेंचा राजकीय श्रीगणेशा झाला. त्यावेळी समाजात होणाऱ्या अन्याया विरोधात आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. वयाच्या अवघ्या 20व्या 1984 साली एकनाथ शिंदे याना ठाण्याच्या किसन नगरचं शाखाप्रमुख पद त्यांना देण्यात आलं. (Eknath Shinde Biography in Marathi)
1997 मध्ये ते ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. त्यानंतर 2001 मध्ये ते ठाणे महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते झाले. सलग तीन वर्षे पद सांभाळले. 2004 मध्ये तत्कालीन ठाणे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2009 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा आमदार झाले. 2014 साली सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत फडणवीस सरकार मध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले. 2019 मध्ये राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी नगरविकास खात्याची जबाबदारी पार पडली. आता शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर भाजप सोबत सत्ता स्थापन करत त्यांनी मुख्यमंत्री पद मिळवले. Eknath Shinde Biography in Marathi
हे पण वाचा :
शिवसैनिक आक्रमक!! श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले
आम्ही शिवसेनेचेच सदस्य, काँग्रेस- राष्ट्रवादीनेच सेनेला हायजॅक केलं
हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा; मुख्यमंत्र्यांचा शिंदेवर हल्लाबोल
साताऱ्यात आ. शंभूराज देसाई यांच्या विरोधात आंदोलन
मुंबईत 10 जुलै पर्यंत जमावबंदी लागू