Monday, March 20, 2023

Eknath Shinde : एकनाथ शिंदे करणार मोठा गौप्यस्फोट; BKC वरील दसरा मेळावा LIVE

- Advertisement -

मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आजच्या दसरा मेळाव्यात काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेले आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील बीकेसी मैदानावर सुरु झाला आहे. याचवेळी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दसरा मेळावादेखील शिवाजीपार्क येथे सुरु आहे. एकनाथ शिंदे आजच्या मेळाव्यात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याकरता (Dasara Melava) जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिंदे गटातील सर्व मंत्र्यांना आपापल्या मतदार संघातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते घेऊन येण्याचं सांगण्यात आलं आहे. यानुसार मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातूनही कालपासूनच शिंदे गटाचे कार्यकर्ते ठेवून दिलेल्या बस व वाहनाने मुंबईकडे आले आहेत.

दरम्यान, आजचा दसरा मेळावा शिंदेगटासाठी अतिशय महत्वाचा असल्याचं समजलं जात आहे. आजच्या दसरा मेळाव्याला शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणाला शिवसैनिक गर्दी करतात कि शिंदे गट गर्दी जमवण्यात बाजी मारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे