हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 4 जुलै रोजी विशेष अधिवेशनामध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. याबाबत शिंदे यांनी ट्विट करत खुलासा केला आहे. “शरद पवार यांच्यासोबत कोणतीही भेट झाली नसल्याने अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे त्यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले असून त्यांनी त्यात म्हंटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे शिंदे यांनी ट्विटद्वारे खुलासा केला आहे.
तसेच शिंदे यांनी अजून एक ट्विट केले असून त्यात त्यांनी सांगितले आहे की, शरद पवार यांना आपण भेटलो आहे पण त्यांची व माझी भेट ही 11 नोव्हेबर 2021 रोजी झाली होती. असे सांगितले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील पवारांशी भेटीचा फोटोही शिंदे यांनी ट्विट केला आहे.
या भेटी दरम्यानचा हा फोटो आहे… pic.twitter.com/vMAMIcTjfL
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 6, 2022
दरम्यान, शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीबाबतच्या चर्चेनंतर आता एकनाथ शिंदे यांनी स्वतः खुलासा केला आहे. तसेच अशा चर्चांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे.