अरे एकनाथ शिंदे 40 दिवस जेल भोगून आला आहे; मुख्यमंत्री शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक घडामोडींवर भाष्य केले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. यावरून मुख्यमंत्री शिंदेनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. “मागील अडीच वर्षात काय केलं? असे विचारत आहात. अरे एकनाथ शिंदे 40 दिवस जेल भोगून आला आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा आंदोलनात. तुम्हाला आम्हाला शिकवण्याचा अधिकार नाही, असे शिंदे यांनी म्हंटले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, कर्नाटकच्या विषयावर मी बोललो आहे. हा 2012 चा विषय आहे, त्यावेळी कोणाचं सरकार होतं. काल-परवा आम्ही निर्णय घेतला, तुम्ही मागील अडीच वर्षे सत्तेत होता काय केलं तुम्ही? तुम्ही योजना बंद केल्या, परवाच्या बैठकीत या बंद झालेल्या योजना आम्ही सुरू केल्या. ज्या योजना नव्हत्या त्या नव्याने सुरू केल्या, सीमावर्ती भागात मराठी माणसाला न्याय देण्याचं काम आम्ही करतोय. त्यामुळे मराठी माणसाबद्दल आम्हाला शिकवण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील एक इंचही जागा कुठेही जाऊ देणार नाही. जत तालुक्यातील 40 गावांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यावर टीका केली होती.”मुख्यमंत्री विशेषता भाजपाच्या अख्तारितले हे त्यांच्या वरिष्ठांच्या परवानगीशिवाय काही बोलू चालू शकतात का? पंतप्रधानांनी सांगितलंय 40 गावं त्यांना द्या, POK तील 100 गावं तुम्हाला देऊ” अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांना ठाकरेंनी टोला लगाव उद्धव ठाकरे यांच्या या आरोपानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरेंवर पलटवार केला आहे.