संजय राऊतांचे मुख्य नेतेपद जाणार?; ठाकरे नंतर आता राऊत शिंदे गटाच्या टार्गेटवर

0
95
Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिले. त्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी शिवसेनेच्या विधीमंडळातील कार्यालयावरही ताबा घेतला. शिंदे गटाने ठाकरेंना टार्गेट केल्यानंतर आता सन्जय राऊत यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. कारण राऊतांचे शिवसेनेच्या संसदीय मुख्य नेतेपद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: तसे संकेत दिले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटारातील आमदारावर अतिशय घालच्या शब्दात टीका केली जात आहे. काळ त्यांनी मुख्यमंत्री शिंदेवर घणाघाती टिकाहीही केली. त्यामुळे आक्रमक झालेल्या मुख्यमंत्री शिंदेनी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात त्यांचे मुख्यनेते पद काढून घेण्याचा निर्णय असल्याचे सांगितले जात आहे.

संजय राऊतांचं मुख्य नेतेपद काढून घेतल्यानंतर त्यांच्या जागी खासदार गजानन कीर्तीकर मुख्य नेते होण्याची शक्यता आहे. विधीमंडळ पक्षानंतर आता संसदीय पक्ष शिंदेंकडे जाणार आहे. राऊतांच्या पदाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सूचक वक्तव्यही केले आहे.

शिवसेनेतील कोट्यवधींची मालमत्ता प्रकरण

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा फटका उद्धव ठाकरेंना बसणार आहे. शिवसेना पक्षाचा फंड वापरण्याचीही परवानगी एकनाथ शिंदे यांना देण्यात आली आहे. शिवसेना पक्षाकडे तब्बल 148 कोटी रुपयांची FD आमि 186 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. नाव आणि पक्ष चिन्ह सह मालमत्ता आणि डिपॉझिट रक्कम वापरण्यासही निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.