राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, वाऱ्यावर सोडणार नाही : एकनाथ शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या राज्य सरकार पाठीशी आहे. त्यांना वाऱ्यावर सोडणारे नाही. ज्या ज्या भागात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्या भागाचा महसूल यंत्रणेने तातडीने पंचनामा करावा तसेच लगेच कामाला लागावे,” असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

राज्यामध्ये काल ठाणे, कल्याण-डोंबिवली, धुळे, जळगाव या जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पिकांचे आतोनात नुकसान केले. या नुकसानीमुळे बलिसाजा कोलमडून गेला आहे. नुकसानीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा मिळाला पाहिजे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास, पुन्हा एकदा हिरावून घेतला आहे. दरम्यान जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीसह फळबागांचे नुकसान झाले आहे. शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतात घेत असलेलया शेतमालास किती दर मिळाला आहे. हे रोजचे बाजारभाव चेक करणे खूप गरजेचे आहे. यामुळे भाव कधी वाढले? याची माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi हे अँप डाउनलोड करून Install करा. याच्या मदतीने स्वतः आपल्याला हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजार समितीमधील ताजा बाजारभाव चेक करू शकतो. तुम्हीही या अतिशय महत्वाच्या सेवेचा मोफत लाभ घेण्यासाठी आजच तुमच्या मोबाईलवर Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

हवामान विभागानं राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अशात ठाण्यात होळी दहनाचा कार्यक्रम सुरू असतानाच पावसाने बरसायला सुरुवात केली. तर कल्याण, डोंबिवली, भिवंडीतही पावसानं दिवसभर हजेरी लावली. जळगावमध्ये अवकाळी पावसाने आणि धुळे जिल्ह्यात गारपिटीने पिकांचं मोठे नुकसान केले आहे.

Jalgaon banana crops affected

जळगावात केळी, गहू, हरभरा पिकाला फटका

जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्याने केळी, गहू, हरभरा आणि मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, मुक्ताईनगर आणि यावल तालुक्यात जोरदार वादळी वारा झाल्याने केळी, गहू, हरभरा आणि मका या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

loss of crops

धुळ्यात गारपीट, पिकांचं मोठं नुकसान

धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा हिरावून घेतला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. एकीकडे संपूर्ण राज्यात होळीचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा होत असताना दुसरीकडे निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. जिल्ह्यातील खोरी टिटने भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून यामुळे पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.