हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा मुद्दा चांगलाच गाजला. विरोधी आघाडीच्या नेत्यांनी बंडखोर आमदारांसह भाजपवर निशाणा साधला. त्याला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात उत्तर दिले. यावेळी एकनाथ शिंदे याची भावूकता, आक्रमकता सभागृहाने पाहिली. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी का केली यामागचे खरे कारण सांगितले. माझे शिवसेनेत खच्चीकरण झाले. ते आता नाही तर खूप अनेक वर्षांपासून होत होते. मला जेव्हा वाटले कि माझ्यासह माझ्या सहकारी आमदारांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तेव्हा मी बंडखोरी केली. मात्र, आजही मी शिवसैनिक आहे. बाळासाहेब आमच्या ह्रदयात आहेत, असे शिंदे यां म्हंटले.
सभागृहात एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, आमच्यावर काय काय टीका करण्यात आली. आमचा बापही काढण्यात आला. मात्र, त्यांना मी सांगतो कि माझ्या घरावर दगड मारण्याची हिंमत झाली नाही आणि ती कुणी करणारही नाही. असा इशारा शिंदे यांनी राऊतांना दिला.
यावेळी बंडखोरीबाबत शिंदे म्हणाले की, स्वत:चं मंत्रीपद दावावर लावून मी 50आमदारांना घेऊन, समोर बसलेल्या बलाढ्य सरकारविरोधात बंड पुकारले. समोर सत्ता, यंत्रणा, एवढी मोठी माणसं होती. दुसरीकडे बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सैनिक. मला अभिमान आहे या ५० लोकांचा. आपण हे मिशन सुरु केलं तेव्हा कोणी विचारलं नाही. कुठे चाललोय, कधी चाललोय, किती वेळ लागणार कोणी विचारलं नाही. सुनिल प्रभु यांना माहिती आहे माझं कशाप्रकारे खच्चीकरण झालं. शिवसेना वाचवण्यासाठी मी शहीद झालो, तरी चालेल. पण मागे हटणार नाही.
एका बाजुला महान नेते होते, सरकार होते, यंत्रणा होती आणि दुसरीकडे माझ्यासारखा एक साधा शिवसैनिक होता. पण माझ्या भरोशावर चाळीस आमदारांनी सगळं पणाला लावलं. या सगळ्यांचा मला अभिमान आहे. मी या सगळ्यांना सांगितलंय की पुढं काय व्हायचं ते होवो, तुमचं नुकसान होतंय असं वाटलं तर मी तुमचं नुकसान होऊ देणार नाही. तर मी जगाचा निरोप घेऊन निघून जाईन, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
पुढील विधानसभा निवडणुकीत 200 आमदार निवडून आणणार – शिंदे
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे निशाणा केले. ते म्हणाले की, अजित पवार म्हणाले पुढच्यावेळी बंडखोर आमदार निवडून येणार नाहीत. त्यांना एकच सांगतो कि, आम्ही शिवसेना सोडलेली नाही. भाजपासोबत आम्ही पुढील विधानसभा निवडणुकीत 200 आमदार निवडून आणून दाखवू, असे शिंदे यांनी म्हंटले.