आम्ही वर्षावर येणाऱ्यांना चहापाणी देतो बिर्याणी देत नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवारांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “आमचं सरकार चांगलं काम करत आहे. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काम करत नाही. आम्ही वर्षा बंगल्यावर चहापाण्यावर पैसे खर्च केल्याचा आरोप केला जात आहे. दररोज हजारो लोक भेटण्यासाठी आम्हाला येतात. वर्षा बंगल्यावर लोक भेटायला आल्यानंतर त्यांना चहापाणी द्यायला पाहिजे का नको? ही आपली संस्कृती आहे. त्यांना आम्ही चहा पाणी देतो बिर्याणी देत नाही. सिंचनासाठी जे पैसे खर्च केले त्यातून किती जमीन सिंचित झाली?” असा सवाल करत मुख्यमंत्री शिंदेची टोला लगावला.

चहापाण्याची चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला तसेच प्रत्येक आरोपांचा समाचार घेतला. यावेळी शिंदे म्हणाले की, उद्यापासून सुरु होत असलेल्या अधिवेशनात विरोधकांनी सकारात्मक मुद्दे मांडावेत, त्याच्यावर चर्चा केली जाईल. या अधिवेशनातून आम्ही जनतेच्या प्रश्नांवर भर देऊ.

रखडलेल्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत. अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. मुंबईतील प्रकल्पांचं काम वेगात सुरू आहे. या अधिवेशनात धोरनात्मक निर्णय होतील. विरोधकांनी आज चहापानावर बहिष्कार घातला. त्यांच्यासोबत चहापान टळलं हे बरंच झालं. सत्ता गेल्यामुळे विरोधक वैफल्यग्रस्थ झाले आहेत. त्यामुळे आम्ही समजू शकतो, असा टोला शिंदे यांनी लगावला.

अजित पवारांच्या कांद्याच्या प्रश्नावर फडणवीसांचे उत्तर

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बार्शी येथील राजेंद्र चव्हाण यांनी ५१२ किलो कांदा विक्रीला आणला होता. छोटा कांदा असतो, तो कमी प्रतीचा असतो. त्याला १०० ते १५० भाव मिळतो. तर चांगल्या प्रतीच्या कांद्याला ५०० ते १४०० रुपये दर मिळतो. या पद्धतीने चव्हाण यांना ५१२ रुपये आले. मात्र त्यांच्या हातात दोन रुपये आले. त्याच कारण म्हणजे एकूण रकमेतून वाहतुकीचा खर्च वजा करण्यात आला.

२०१४ साली आपण जीआर काढला आहे. त्यात आपण कमी प्रतिच्या दरातून वाहतुकीचा खर्च वजा करता येत नाही. मात्र तो खर्च वजा केल्याने शेतकऱ्याला दोन रुपये मिळाले. ही बाब लक्षात येताच संबंधीत सूर्या व्यापाऱ्याचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. या मुद्दावरून विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी टीका केली होती.

राणेंना जेवत्या ताटावरून उठवलं; मुख्यमंत्री शिंदे

आरोप करताना त्याला पुरावे पाहिजेत. धमक्या दिल्याचे खोटेनाटे आरोप केले जात आहेत. नारायण राणे यांना जेवत्या ताटावरून उठवलं, केतकी चितळेला तुरूंगात टाकलं, कंगना रणौतच घर तोडलं. गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याचा प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीस यांना तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, आमच्यावर आता खोटेनाटे आरोप करत आहेत. आम्हाला लोकांचं प्रेम मिळत आहे, त्यामुळे अजित पवार यांच्या पोठात दुखत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटले.

अजित पवार काय म्हणाले?

आज पत्रकार परिषद घेत अजित पवार यांनी म्हंटले की, विकासकामा ऐवजी इतर गोष्टींवर उधळपट्टी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावरील जेवणाचे बील 2 कोटी 38 लाख रुपये आलेले आहे. मी उपमुख्यमंत्री होतो. आमचे काही सहकारीदेखील मुख्यमंत्री होते. चार महिन्यात जेवणाचं बील 2 कोटी 38 लाख रुपये आले. एवढं बील कसं काय? चहामध्ये सोन्याचं पाणी वगैरे घातलं होतं का? सरकार चहात सोन्याचा अर्क टाकते का? असा सवाल पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना विचारला होता.