बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच…; गुरुपौर्णिमेनिमित्त एकनाथ शिंदेंचं ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यातील घराघरात शिवसेनेना पोहचवणाऱ्या आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे गिरवलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादन केले आहे. “बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच…,”असे म्हणत गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादनाचे नुकतेच एक ट्विट केले आहे.

आज गुरुपौर्णिमा असल्याने या दिवशी गुरूला खूप मोठे महत्व असते. शिष्याकडून आपल्या गुरुची पूजा केली जाते. राजकारणातही आपल्याला राजकारणाचे धडे गिरवणाऱ्या शिष्याकडून आपल्या गुरूला अभिवादन केले जाते. त्यानुसार आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपल्या गुरूंना आभिवादन केले आहे. “बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही,” असे म्हणत त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादनपर ट्विट केले आहे.

शिंदे यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचाही फोटो दाखवण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी नुकतीच बंडखोरी करत शिवसेनेच्या 40 आमदारांचा पाठिंबा मिळवत भाजपशी युती केली. शिंदेंच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले.

 

उद्धव-राज यांच्या अगोदर ट्वीट

एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादनचे जे ट्विट केले आहे. त्या ट्विटला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे. कारण त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ट्वीटच्या अगोदर ट्वीट करत आपण बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणार आहोत, असे दाखवून दिले आहे.

Leave a Comment