मुंबई । राज्यातील ११६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीत थेट सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 13 ऑक्टोबरला मतदान पार पडेल. ही निवडणूक जास्त महत्त्वाची आहे.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर सरपंचपदाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय ओबीसींना राजकीय आरक्षण देखील लागू असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध तालुक्यांतील ११६६ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला 2022 रोजी मतदान होणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती तालुक्यांमध्ये ग्रामपंतायत निवडणुका?
> ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, आणि शहापूर- 79.
> पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 आणि वाडा- 70.
> रायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 आणि श्रीवर्धन- 1.
> रत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 आणि राजापूर- 10.
> सिंधुदुर्ग: दोडामार्ग- 2 आणि देवडगड- 2.
> नाशिक: इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 आणि पेठ- 71.
> नंदुरबार: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 आणि नवापूर- 81.
> पुणे: मुळशी- 1 आणि मावळ- 1.
> सातारा: जावळी- 5, पाटण- 5 आणि महाबळेश्वर- 6.
> कोल्हापूर: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 आणि चंदगड- 1.
> अमरावती: चिखलदरा- 1.
> वाशीम: वाशीम- 1.
> नागपूर: रामटेक- 3, भिवापूर- 6 आणि कुही- 8.
> वर्धा: वर्धा- 2 व आर्वी- 7.
> चंद्रपूर: भद्रवाती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 आणि ब्रह्मपुरी- 1.
> भंडारा: तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 आणि साकोली- 1.
> गोंदिया: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 आणि अर्जुनी मोर- 2.
> गडचिरोली: चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 आणि गडचिरोली- 1.