मृत पिल्लाला घेऊन हत्तीणीची फरफट, मन हेलावणारा व्हिडिओ आला समोर

elephant
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आईचे आपल्या मुलावर खूप प्रेम असते. मग ते प्राणी असो किंवा माणसे. सध्या अशाच एका हत्तीणीचा (elephant) मन हेलावून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधून हत्तीणीचं (elephant) तिच्या पिल्लावर किती प्रेम आहे ते पाहायला मिळत आहे. यामध्ये एक हत्ती (elephant) आपल्या मृत पिल्लाला घेऊन अनेक तास गार्डनमध्ये फिरताना दिसत आहे. तिचे हे बाळ मृत पावलं आहे. पण या हत्तिणीला त्यावर विश्वा. बसत नाही ती या बाळाला घेऊन फिरत आहे. हा व्हीडिओ पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीमधील आहे. हा मन हेलावून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील चहाच्या बागेत एका हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू झाला. या पिल्लाच्या आईला त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही. ही हत्तीण आपल्या मृत बाळाचा मृतदेह घेऊन गार्डनमध्ये इकडून तिकडे फिरत आहे. तिच्या मृत मुलाला तिने तिच्या सोंडेच्या माध्यमातून 7 किलोमीटरपर्यंत नेले. या प्रकाराची माहिती मिळताच बिनागुरी वन्यजीव पथकाचे वन कर्मचारी काही वेळात घटनास्थळी पोहोचले. मात्र मृत हत्तीचं प्रेम पाहून त्यांच्याही डोळ्यात अश्रू आले.

हत्तिणीचे (elephant) आपल्या बळावरचे प्रेम बघून या बाळाला आईपासून वेगळं करण्याची वन कर्मचाऱ्यांची हिंमत झाली नाही.चामुर्ची ग्रामपंचायत परिसरातील अंबारी चहाच्या मळ्यात 7 किमी या बाळाला घेईन फिरली. माता हत्ती (elephant) काहीही झालं तरी ती तिच्या पिल्लाला सोडायला तयार नव्हती. हे दृश्य पाहून कुणाचंही हृदय हेलावल्याशिवाय राहाणार नाही.

हे पण वाचा :

कार चालकाच्या एका छोट्याशा चुकीमुळे महामार्गावर भीषण अपघात

नागपुरची कन्या संजना जोशी राष्ट्रकुल स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्त्व, कोण आहे संजना जोशी ?

जिथे राष्ट्रवादी स्ट्राॅंग तिथे शिवसेनेवर अन्याय : खा. श्रीकांत शिंदे

कांदा उत्पादकांना सरकारने अनुदान द्यावे, अन्यथा आंदोलन : सदाभाऊ खोत

संजय राऊतांचा आ. शिवेंद्रसिंहराजेंवर हल्लाबोल म्हणाले…