नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्कने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक मोठी घोषणा केली आहे. मस्कने सांगितले की,” तो जॉब सोडून इनफ्लुएंसर बनण्याचा विचार करत आहे. मस्क टेस्लामध्ये आपला स्टेक सतत कमी करत आहे. गुरुवारी त्याने कंपनीचे 934,091 शेअर्स 96.3 कोटी डॉलर्समध्ये विकले. 10 टक्के शेअरच्या विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्याला आणखी 60 लाख शेअर्स विकावे लागतील.
मस्कने असे ट्विट केले आहे
मस्कने ट्विट करून म्हटले की, ‘मी माझा जॉब सोडून पूर्णवेळ इनफ्लुएंसर बनण्याचा विचार करत आहे.’ यासोबतच त्याने लोकांचे मतही विचारले आहे.
मस्कच्या ट्विटला अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने त्याला आपले यूट्यूब चॅनल सुरू करण्याचे सुचवले आहे. मस्कचे ट्विट अशा वेळी आले आहे जेव्हा टेस्लाचा सीईओ सोशल मीडियावरील सर्वात प्रभावशाली चेहऱ्यांपैकी एक आहे.
जगातील सर्वात मोठा श्रीमंत एलन मस्क आपल्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतो. पण यावेळी त्याच्या नवीन हेअरकटने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या हेअरकटमुळे त्याची तुलना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनशीही केली जात आहे. गंमत म्हणजे मस्कने स्वतःच केस कापल्याचे सांगितले. यावर सोशल मीडियावर अनेक फनी मीम्स बनवले जात आहेत.
शेअर्स विकण्याबाबत युझर्सकडून मत मागवले
यापूर्वी, 6 नोव्हेंबर रोजी एलन मस्कने ट्विटरवर आपल्या फॉलोअर्सना विचारले होते की त्याने आपले 10% स्टेक विकावे का? बहुसंख्य फॉलोअर्सनी त्याला सपोर्ट केला. तेव्हापासून, एलन मस्कने त्याच्या कंपनीचे सुमारे 92 लाख शेअर्स विकले आहेत, ज्यांचे मूल्य 9.9 अब्ज डॉलर्स आहे. गेल्या मंगळवारी, एलन मस्कने कर दायित्व भरण्यासाठी टेस्लाचे 934,091 शेअर्स विकले.
एलन मस्क शेअर्स का विकत आहेत?
वास्तविक एलन मस्क पगाराऐवजी टेस्लामध्ये स्टॉक ऑप्शंस घेतो. यामध्ये त्याला बाजारभावापेक्षा 90% कमी किमतीत टेस्लाचे शेअर्स खरेदी करण्याचा अधिकार मिळतो. 2012 मध्ये, टेस्लाने एलन मस्कला स्टॉक ऑप्शंस दिले. या अंतर्गत मस्कला कंपनीचे सुमारे 2.28 कोटी शेअर्स केवळ 6.24 डॉलर प्रति शेअर या किमतीत खरेदी करण्याचा पर्याय मिळाला. याचा फायदा घेण्यासाठी मस्ककडे 2022 पर्यंत वेळ होता.