Elon Musk पुन्हा ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; पहा त्यांची एकूण संपत्ती

Elon Musk
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्लूमबर्ग बिलियनेअर्स यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये अरबपतींच्या लिस्ट मध्ये बरेच चढ उतार दिसत आहे. यातच आलेल्या अपडेट नुसार टेस्लाचे सीईओ एलोन मस्क हे सर्वांत श्रीमंत उद्योगपती बनलेले आहे. त्यांनी फ्रान्समधील अब्जाधीश आणि फॅशन ग्रुप लुई विटा मोएट हेनेसीचे सीईओ बर्नार्ड अरनॉल्ड यांना मागे टाकत पहिले स्थान गाठलं आहे. गेल्या पाच दिवसांपासून एलोन मस्क यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली. अचानक एवढी वाढ कशी झाली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर आहे टेस्लाच्या स्टॉकमधील झालेल्या वाढीमुळे….

सध्या एलोन मस्क यांची संपत्ती $193 अब्ज म्हणजे सुमारे 15.85 लाख कोटी इतकी झाली आहे. दुसरीकडे मस्क यांनी ज्या बर्नार्ड अरनॉल्ड यांना मागे टाकून नंबर वनचा ताज पटकावला त्यांची संपत्ती $187 अब्ज डॉलर्स म्हणजे 15.43 लाख कोटी रुपये एवढी आहे. जर आपण टॉप 5 श्रीमंत व्यक्तीकडे नजर टाकली तर अमेझॉनचे मालक जेफ बेझोस हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संप्पती $ 144 अब्ज एवढी आहे. चौथ्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे असून त्यांची संपत्ती 125 अब्ज डॉलर तर पाचव्या क्रमांकावर लॅरी एलिसन यांचा नंबर लागतो. त्यांची संपत्ती 118 अब्ज डॉलर एवढी आहे.

भारतीय उद्योगपतींच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, टॉप 5 तर सोडाच परंतु टॉप 10 मध्ये सुद्धा एकही भारतीय नाही. या ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या यादीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे 13 व्या स्थानावर असून त्यांची संपत्ती 84.7 अब्ज डॉलर्स एवढी आहे. आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे 61.3 अब्ज डॉलर एवढी संपत्ती सह 19 व्या क्रमांकावर आहेत.