Elon Musk मोदींना भेटण्यासाठी भारतात येणार; Tesla मोठा प्लांट उभारणार??

Elon Musk Narendra Modi
Elon Musk Narendra Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Elon Musk) लवकरच भारतात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत. इलॉन मस्क यांनी स्वत: ट्विटर (x) वर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे Tesla भारतात मोठा प्लॅन उभारणार असल्याचे स्पष्ट होत आहे. अनेक दिवसांपासून भारतात इलेक्ट्रिक गाड्या उत्पादन करण्याचा टेस्लाचा प्रयत्न आहे. आता एलोन मस्क यांचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने आहे.

एलोन मस्क या महिन्याच्या अखेरीस नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी भारताला भेट देणार आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार एलोन मस्क 22 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात भारत दौऱ्यावर ((Elon Musk India Visit) असतील. यावेळी मस्क यांच्यासोबत कंपनीचे इतर अधिकारीही येऊ शकतात. या दौऱ्यात मोदींशी चर्चा केल्यानंतर ते भारतात गुंतवणुकीबाबत आणि नवीन प्लांट उभारण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. खरं तर मागील वर्षी जूनमध्ये नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असतानाच मस्क यांनी मोदींची भेट घेऊन भारताला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती, तसेच टेस्लाचा प्लांट भारतात सुरु होईल असा विश्वासही मोदींकडे व्यक्त केला होता. परंतु उच्च आयात करामुळे पुढे चर्चा झाली नव्हती.

परंतु आता काही आठवड्यांपूर्वीच भारत सरकारने नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत, किमान $ 500 दशलक्ष (सुमारे 4 हजार कोटी रुपये) गुंतवणुकीसह देशात उत्पादन युनिट्स स्थापित करणाऱ्या कंपन्यांना आयात शुल्कात सवलत दिली जाईल. सरकारच्या या पावलाचा उद्देश टेस्लासारख्या मोठ्या जागतिक कंपन्यांना आकर्षित करणे हाच आहे

यापूर्वी चर्चेचं घोडं कुठे अडलं होते –

भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याचा मानस टेस्लाने यापूर्वीच व्यक्त केला होता, चीन किंवा इतर देशांमध्ये टेस्ला कार बनवून भारतीय बाजारपेठेत विकण्याचा टेस्लाचा प्रयत्न होता. मात्र भारत सरकारने टेस्लाला चिनी बनावटीच्या कार भारतात विकण्याची परवानगी दिली नव्हती. टेस्लाची वाहने भारतातच तयार करावीत, तरच त्या गाडयांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळेल आणि सवलत देण्याचा विचार करता येईल असं स्पष्ट भूमिका सरकारने घेतली होती.