नवी दिल्ली । टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क यांची ट्विटरवर एन्ट्री झाल्यापासूनच अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. यामुळे ही अमेरिकन मायक्रोब्लॉगिंग कंपनी सतत चर्चेत असते आणि यामुळे तिच्या शेअर्सचे भाव वाढत आहेत. पहिले, मस्कने ट्विटरमध्ये 9.2 टक्के हिस्सा खरेदी केला. त्यानंतर ते ट्विटरच्या बोर्डात सामील होणार असल्याची बातमी आली.
आता एक दिवस आधीच एलन मस्कने ट्विटर विकत घेण्याची ऑफर देऊन संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले. त्यांच्या या ऑफरबाबत ट्विटरने सांगितले की, त्यांच्या या प्रस्तावावर कंपनीचे बोर्ड विचार करेल आणि भागधारकांच्या हितासाठी सर्वोत्तम निर्णय घेतला जाईल. यानंतर, मस्कच्या वतीने सांगण्यात आले की, जर ट्विटरने त्यांची ऑफर नाकारली तर त्यांना त्यांची भूमिका बदलावी लागेल.
मस्कचा प्लॅन बी काय आहे?
मस्कचे हे स्टेटमेंट एक प्रकारे धोक्याचेच मानले गेले आणि मग अशा बातम्या येऊ लागल्या की, त्यांनी बळजबरीने ट्विटरचा ताबा घेतला. आता अमेरिकन मीडियामध्ये एलन मस्कच्या हवाल्याने अशी बातमी येत आहे की, जर ट्विटरने त्यांची ऑफर नाकारली तर त्यांनी ते खरेदी करण्यासाठी प्लॅन बी तयार केला आहे. मस्क यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी ट्विटरला प्रायव्हेट करण्यासाठी अनेक शेअरहोल्डर्सना कायद्याच्या कक्षेत ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
जबरदस्तीच्या खरेदीपासून ट्विटरला वाचवणार Vanguard !
जर मस्कने जबरदस्तीने ट्विटरला विकत घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या प्रयत्नांना धक्का बसू शकेल. यामागील कारण आतापर्यंत असे म्हटले जात होते की, एलन मस्क हे ट्विटरचे सर्वात मोठे सिंगल शेअरहोल्डर आहेत ज्यांची 9.2 टक्के हिस्सेदारी आहे. त्यांनी हा स्टेक गेल्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये खरेदी केला होता. मात्र आता असे नाही कारण आता ट्विटरचा सर्वात मोठा स्टेक Vanguard Group कडे आहे.
Vanguard ही अमेरिकन इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायझरी फर्म आहे. ते अनेकदा ट्विटरच्या मॅनेजमेंट सोबत उभे असल्याचे पाहायला मिळते. हेज फंड किंवा इतर गुंतवणूकदारांसारखा ते वेगळा दृष्टिकोन घेत नाही. आतापर्यंत त्यांनी मॅनेजमेंटच्या बाजूने मतदान केले आहे. म्हणूनच जर Twitter च्या संचालक मंडळाने एलन मस्कची ऑफर नाकारली आणि मस्कने त्याच्या प्लॅन बीचा भाग म्हणून जबरदस्तीने ते विकत घेण्याचा प्रयत्न केला, तर Vanguard ट्विटरच्या बचावासाठी पुढे येऊ शकतो कारण तो आता त्याचा सर्वात मोठा भागधारक आहे.
Vanguard कडे 10.3% हिस्सा आहे
Vanguard कडे आता कंपनीचे 8.24 कोटी शेअर्स आहेत आणि तिची हिस्सेदारी 10.3 टक्के झाली आहे. व्हॅनगार्डने 8 एप्रिल रोजी यूएस सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनला ट्विटरमधील त्याच्या स्टेकबद्दल माहिती दिली आहे. म्हणजेच मस्कचे शेअर्स खरेदी केल्यानंतर व्हॅनगार्डने आपली हिस्सेदारी वाढवली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्ट्स नुसार, 13 एप्रिल रोजी ट्विटरच्या स्टॉकच्या क्लोसिंग प्राईसच्या आधारावर, Vanguard च्या स्टेकचे मूल्य $3.78 अब्ज आहे. डिसेंबर 2021 अखेरपर्यंत, Vanguard कडे Twitter चे सुमारे 70.4 मिलियन शेअर्स होते. त्यावेळी त्यांची कंपनीतील भागीदारी 8.8 टक्के होती.