न्यूझीलंडला मोठा धक्का ! दुखापतीमुळे केन विलियमसनची दुसऱ्या कसोटीमधून माघार

kane williamson
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लंडन : वृत्तसंस्था – इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. या दुसऱ्या कसोटीत कोपराला दुखापत झाल्यामुळे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन खेळू शकणार नाही. सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. पहिला लढत लॉर्ड्स मैदानावर झाली. ही लढत ड्रॉ झाली होती. यांच्यातली दुसरी लढत उद्या १० जूनपासून सुरू होणार आहे.

दुसऱ्या कसोटीनंतर न्यूझीलंडला भारताविरुद्ध WTC फायनल खेळायची असल्याने त्यांनी कोणताही धोका न पत्करण्याचे ठरवले आहे. केन विलियमसन जरी दुसरी कसोटी खेळणार नसला तरी भारताविरुद्धच्या फायनल सामन्यात तो संघाचे नेतृत्व करणार आहे असे न्यूझीलंड संघाकडून सांगण्यात आले आहे. मार्च महिन्यानंतर तो प्रथमच कसोटी सामन्याला मुकणार आहे. केन विलियमसनला इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात १३ तर दुसऱ्या डावात फक्त एकच धाव करता आली होती.

१८ जूनपासून साऊदम्प्टन या ठिकाणी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. तेव्हा या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. केन विलियमसन अंतिम सामन्यापूर्वी फिट होईल, असे मुख्य कोच गॅरी स्टीड यांनी सांगितले आहे. दुसऱ्या कसोटीत केन विलियमसन बरोबर फिरकीपटू मिशेल सॅटनरदेखील दुखापतीमुळे खेळू शकणार नाही.