हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण नोकरी करत असाल आणि आपले EPF अकाउंट असेल तर ही बातमी आपल्यासाठीच महत्वाची ठरेल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या सर्व PF खातेधारकांना नॉमिनी (EPF Nominee) जोडणे अनिवार्य केले आहे. कारण नॉमिनी असल्यावर, ईपीएफ चा क्लेम मिळण्यास कोणतीही अडचण येत नाही. तसेच यामुळे खातेदाराला ज्याला द्यायचे आहेत त्यालाच ते दिले जातात. म्हणूनच ईपीएफ सब्सक्राइबरसाठी नॉमिनेशन करणे फायद्याचे आहे. आता तर EPFO ने नॉमिनेशन न केलेल्या ग्राहकांच्या काही सुविधा देखील बंद केल्या आहेत.
त्याच बरोबर जर एखाद्या खातेदाराने नॉमिनेशन केलेले नसेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयाला पैसे काढता येणार नाहीत. मात्र अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबातील सदस्य फॉर्म 20 भरून क्लेम करू शकतील.
कोणाला मिळतील पैसे ???
जर एखाद्या EPF खातेधारकाचा नॉमिनेशन न करता मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना पैसे काढण्यासाठी फॉर्म 20 भरावा लागेल. मात्र ईपीएफओचा असा नियम आहे की, जर सबस्क्रायबरने नॉमिनेशन न करता त्याचा मृत्यू झाला तर ईपीएफमध्ये जमा केलेले पैसे कुटुंबातील सदस्यांमध्ये समान प्रमाणात वाटले जातील.
EPFO यांना कुटुंबातील सदस्य मानले जाईल
हे लक्षात घ्या कि, ईपीएफ खातेदाराच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये पती/पत्नी, मुले (विवाहित किंवा अविवाहित), आश्रित पालक, ग्राहक महिला असल्यास ग्राहकाच्या पतीचे आश्रित पालक, ग्राहकाच्या मुलाची विधवा आणि तिची मुले यांचा समावेश होतो.
अशा प्रकारे भरा फॉर्म 20
ईपीएफ खातेदाराच्या कुटुंबाला पैसे मिळवण्यासाठी फॉर्म 20 भरावा लागेल. ज्यामध्ये पैसे मिळवण्यास पात्र असलेल्या कुटुंबातील सदस्यांची नावे द्यावी लागतील. तसेच कुटुंबातील सदस्यांची माहिती ईपीएफ खातेदार जिथे काम करत असलेली कंपनी देईल. मात्र जर काही कारणास्तव कंपनी ही माहिती देऊ शकत नसेल तर कुटुंबातील सदस्यांची लिस्ट कार्यकारी दंडाधिकार्यांकडून प्रमाणित करून सादर करावी लागेल. याबरोबरच फॉर्म 20 सोबत डेथ सर्टिफिकेट आणि कॅन्सल चेकची फोटोकॉपी देखील जोडावी लागेल.
मृत्यूपत्र असेल तर जास्त वेळ लागेल
जर सबस्क्राइबरने मृत्यूपत्र केले असेल तर क्लेम मिळण्यास आणखी वेळ लागू शकेल. यामागील कारण असे कि, यामध्ये मृत्युपत्राचे सक्सेशन सर्टिफिकेट द्यावे लागते. भविष्यात असा क्लेम कोणी करू नये यासाठी खबरदारी म्हणून असे केले जाते. याच्या तपासाला वेळ लागत असल्यामुळे क्लेम मिळण्यास थोडा उशीर होतो.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.epfindia.gov.in/
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Train Cancelled : रेल्वेकडून 291 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता