हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO मध्ये आतापर्यंत 4.50 कोटींहून जास्त लोकं जोडली गेली आहे. नोकरी करणाऱ्या लोकांच्या पगारातून दरमहा पीएफची रक्कम कापली जाते. पीएफ खात्यातील पैसे हे कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी मोठा आधार ठरू शकतात. या व्यतिरिक्त, यामध्ये 7 लाख रुपयांच्या मोफत विम्याचा लाभही दिला जातो. EPFO चे सर्व सदस्य एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI) 1976 अंतर्गत समाविष्ट आहेत. यामुळे, जर नोकरीदरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला या योजनेअंतर्गत 7 लाखांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल.
EDLI योजनेंतर्गत मिळणारी विम्याची रक्कम ही मागील 12 महिन्यांच्या पगारावर अवलंबून असते. यामध्ये दरमहा, कर्मचार्यांच्या पगारातून जमा केलेल्या PF च्या रकमेपैकी 8.33 टक्के रक्कम EPS मध्ये, 3.67 टक्के EPF मध्ये आणि 0.5 टक्के रक्कम EDLI योजनेमध्ये जमा केली जाते. तसेच कर्मचाऱ्याचा आजार, अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास इन्शुरन्स क्लेम दिला जाईल.
एकरकमी पैसे मिळतील
या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर, विम्याची रक्कम कर्मचाऱ्याने नॉमिनेशन केलेल्या व्यक्तीकडे जाते. तसेच यामध्ये नॉमिनीला हे पैसे एकरकमी दिली जाते. त्याबरोबर जर कोणी नॉमिनी नसेल तर कायदेशीर वारसांना विम्याची रक्कम समप्रमाणात दिली जाते.
नोकरी सोडल्यास कोणताही फायदा मिळणार नाही
EDLI योजनेअंतर्गत, कोणत्याही खातेदाराला कमीत कमी 2.5 लाख तर जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचा इन्शुरन्स क्लेम मिळू शकेल. कमीत कमी क्लेम मिळविण्यासाठी खातेधारकाने किमान 12 महिने नोकरी करणे आवश्यक आहे. तसेच नोकरी सोडणाऱ्या खातेदाराला इन्शुरन्सचा लाभ दिला जाणार नाही. EPFO
नॉमिनेशन करणे आवश्यक
EPFO सदस्यांनी आपल्या खात्यामध्ये नॉमिनीची नोंद करणे आवश्यक आहे. नॉमिनी असण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जर एखाद्या खातेधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला EPF, EPS आणि EDLI योजनांचा लाभ मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तसेच, जर खात्यामध्ये नॉमिनीचे नाव जोडले गेले नाही तर अशा परिस्थितीत खातेदाराच्या सर्व कायदेशीर वारसांना पैसे मिळविण्यासाठी बराच त्रास सहन करावा लागेल. ज्यामुळे क्लेम मिळण्यास उशीर होऊ शकेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.epfindia.gov.in/site_docs/PDFs/Downloads_PDFs/EDLI_1976.pdf
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Train Cancelled : रेल्वेकडून 291 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता