Wednesday, October 5, 2022

Buy now

EPFO ने दिला मोठा धक्का, ‘या’ 4 प्रकारे तपासता येईल PF बॅलन्स

नवी दिल्ली I कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO ​​ने शनिवारी EPF व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांपर्यंत कमी केल्याने कोट्यवधी पगारदार कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या चार दशकांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. जर तुम्ही देखील नोकरी करत असाल तर तुम्ही खालील पद्धतींनी घरबसल्या तुमचा PF बॅलन्स तपासू शकता.

मिस कॉलद्वारे
तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्या. यानंतर EPFO कडून एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुमच्या PF खात्याची माहिती मिळेल. हा कॉल UAN च्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून पाठवावा लागेल.

SMS द्वारे
जर तुमचा UAN EPFO ​​मध्ये रजिस्टर्ड असेल, तर तुमचे नवीनतम योगदान आणि PF बॅलन्सची माहिती मेसेजद्वारे मिळू शकते. यासाठी तुम्हाला EPFOHO UAN ENG 7738299899 वर पाठवावे लागेल. शेवटची तीन अक्षरे भाषेसाठी आहेत. तुम्हाला हिंदीत माहिती हवी असेल तर तुम्ही EPFOHO UAN HIN लिहून पाठवू शकता. हा SMS UAN च्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून पाठवावा लागेल.

EPFO वेबसाइटद्वारे
यासाठी तुम्हाला EPFA च्या वेबसाइटवर जावे लागेल.
येथे Employee Centric Services वर क्लिक करा.
आता View Passbook वर क्लिक करा.
पासबुक पाहण्यासाठी UAN ने लॉगिन करा.

UMANG App द्वारे
तुमचे UMANG App उघडा आणि EPFO ​​वर क्लिक करा.
आता Employee Centric Services वर क्लिक करा.
येथे View Passbook पर्यायावर क्लिक करा.
तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड (OTP) नंबर टाका.
रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर OTP येईल.
OTP टाकल्यानंतर तुम्ही तुमचा PF बॅलन्स तपासू शकता.