हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने नुकतंच मिशन 150 टार्गेट ठेवलं आहे. त्यातच शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदे गट, भाजप आणि मनसे एकत्र निवडणूक लढेल अशाही चर्चा सुरु आहेत. मात्र ३ काय ३० पक्ष एकत्र आले तरी मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहील असं म्हणत युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी भाजप शिंदे गट संभाव्य युतीवर टोला लगावला आहे.
निर्धार अभियानाची सुरुवात करण्यासाठी वरुण सरदेसाई तुळजापुरात पोहचले होते. यावेळी बोलताना वरूण सरदेसाई म्हणाले, मागील तीस वर्षांमध्ये शिवसेनेने आणि उद्धव ठाकरेंनी अशी अनेक आव्हाने पेललेली आहेत. आता सुद्धा जे आव्हान आहे त्याचा सामना करू. ३ काय ३० पक्ष एकत्र आले तरी मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंभीर पणे उभा राहील असा विश्वास वरूण सरदेसाई यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी असेल असे संकेतही वरून सरदेसाई यांनी दिले. आदित्य ठाकरे हे शिवसेनेतील महत्त्वाचे नेते आहेत. मुंबईतअपेक्षीत जी विकास कामे आहेत ती आदित्य ठाकरे पालकमंत्री असताना झाली आहेत. मुंबईतील तरुण वर्ग हा आदित्य ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक जरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असली तरी देखील आदित्य ठाकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी असेल असं वरून सरदेसाई यांनी म्हटलं.




