हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेत फूट पडल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि ठाकरे गटात रोज नवीन वाट पाहायला मिळत आहे. यात खासदार संजय राऊत आपल्या सामनातील अग्रलेखातून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची कोणतीही कसर सोडत नाही. यामध्ये आता संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधू सुनील राऊत यांनी देखील उडी मारली आहे. सुनील राऊत (Sunil Raut) यांनी भाजपासह एकनाथ शिंदेवर जोरदार टीका केली आहे. तर, “आजही मला 100 कोटींची ऑफर आली असली तरी आजच्या घडीला माझा विचार बदलणार नाही” असे सुनील राऊत यांनी म्हणले आहे.
एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या वादात सुनील राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना त्यांनी, “संजय राऊत नावाचा ब्रँड माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे आजही मला 100 कोटींची ऑफर आली असली तरी आजच्या घडीला माझा विचार बदलणार नाही, कारण आम्ही निष्ठावंत असून आम्ही आमचा विचार बदलणार नाही” असे स्पष्ट मत मांडले आहे.
तसेच उपेंद्र सावंत यांचे उदाहरण देत, “मला देखील 100 कोटींची ऑफर आली होती, मात्र बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरील निष्ठेमुळे मी ती ऑफर घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. ती शंभर कोटीची ऑफर का नाकारली हे सांगताना त्यांनी आपल्या नावामागे खासदार संजय राऊत नावाचा ब्रँड असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे अशा कितीही ऑफर आल्या तरी आम्ही आमचा विचार बदलणार नाही” असे सुनील राऊत यांनी म्हणले.
त्याचबरोबर भाजपवर टीका करत, “आमचीच माणसे विकत घेऊन, आमच्याच माणसांना आमच्यासमोर उभा केली जातात. आम्ही निष्ठावंत असल्यामुळेच आम्हाला आता एकही रुपयाचा फंड सरकारकडून मिळत नाही. माझ्यावर 35 कोटींचे कर्ज आहे, कारण 35 कोटींची कामं मी केली आहेत, मात्र सरकार आजही मला पैसे देत नाही” असे राऊत यांनी म्हणले आहे.
दरम्यान, “उपेंद्र सावंत यांनी आज शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पैशासाठी प्रवेश करत निधीसाठी त्यांनी 15 कोटी आणि 5 कोटी कॅशची ऑफर असल्याचे त्यांनी मला 10 दिवसापूर्वीच सांगितले होते. मात्र त्यावेळी त्यांनी मला मी निष्ठावंत आहे, मी घरी बसेल मात्र मी शिंदे गटात जाणार नाही” अशी रोखठोक भूमिका सुनील राऊत यांनी मांडली आहे.