मुंबई प्रतिनिधी | भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी दिलेल्या वक्तव्यावरून भाजप सेना युतीवर काल दिवसभर माध्यमांमधून विचार मंथन छेडल गेल होत. मात्र शिवसेनेने या नंतर आपली सबुरीची भूमिका सामन्याच्या अग्रलेखातून प्रदर्शित केली आहे. यात भाजपवर विश्वास तर व्यक्त केलाच आहे त्याच बरोबर विरोधकांचा देखील खरपूस समाचार घेतला आहे.
सामन्यातून विरोधकांवर टीकेचा आसूड उगारला आहे. अग्रलेखात म्हणले आहे कि, ‘‘त्यांना सत्ता खुर्ची आणि पदासाठी नको आहे.’ आम्हीही तेच सांगत आहोत. इतरही अनेक विषय आहेत. त्यावर नंतर पाहू. बाकी मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहेच, ‘‘सर्वकाही ठरल्याप्रमाणे होईल!’’ त्यामुळे आता स्पष्टच सांगायचे तर शिवसेना-भाजप युतीच्या विरोधकांनी पाण्यात घातलेले देव बाहेर काढावेत हेच बरे! एकतर ही युती आता तुटणार नाही, मतभेदांच्या खडकावर आपटून फुटणार नाही.
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या इतिहास पहिल्यांदा दुसऱ्यापक्षाच्या व्यक्तीला आमंत्रित केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या कार्यक्रमाला जात सेना भाजपच्या युतीचे गमक सर्वांना पटवून दिले. सेना भाजप हे भगव्या झेंड्याखाली एकत्रित आलेले दोन भाऊ आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले.तर उद्धव ठाकरे यांनी युतीत समसमान वाटा मिळावा असे भविष्य कालीन भाकीत केले. आता दोन्ही पक्षाचे नाते आगामी काळात कसे राहील हे देखील बघण्यासारखे राहणार आहे.