स्वाभिमानीकडुन हा माजी अधिकारी लढवू शकतो निवडणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

लोकसभा निवडणूक हि अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना सांगलीच्या जागेवरून काँग्रेस नेत्यांमध्ये अजूनही एकमत होत नसल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी पुणे येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगली लोकसभेच्या जागेबाबत तिढा शोधावण्यासाठी वसंतदादा आणि कदम घराण्याच्या सस्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोघांनीही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचं सांगून टाकलं. त्यामुळे सांगलीच्या जागेचा तिढा आता दिल्ली दरबारी गेला आहे. त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वर्धा ऐवजी सांगली लोकसभेच्या जागेची मागणी केल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.

दरम्यान या सर्व पार्श्वभुमीवर स्वाभिमानीकडून सांगली लोकसभेसाठी माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. इंद्रजित देशमुख हे कोल्हापूर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते त्यांनी आता स्वेच्छा निवृत्ती घेतलेली आहे. इंद्रजित देशमुख हे मूळचे सांगली जिल्ह्यातील माहुली गावचे आहेत त्यांचे वडील दत्ताजीराव देशमुख हे १९५२ साली आमदार होते. देशमुख हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मावस भाऊ आहेत.

राष्ट्रवादी आणि स्वाभिमानाची आता युती असल्याने जयंत पाटील यांचाही या उमेदवारीला ग्रीन सिग्नल असणार आहे. काँग्रेस मधील अंतर्गत गटबाजीमुळे इतिहासात पहिल्यांदाच सांगलीची उमेदवारी हि स्वाभिमानीकडे जाण्याची शक्यता आहे. सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यासाठी काँगेस श्रेष्टी अनुकूल असल्याचंही बोललं जात आहे. स्वाभिमानीकडे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचा या उमेदवारीला फायदा होणार असल्याचं स्पष्ट असल्याने सांगली लोकसभा काँग्रेस ऐवजी स्वाभिमानी लढवणार असल्याचं समोर येत आहे.

Welcome-Amy-Main1.jpg

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा

सुजय विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश ?

‘या’ जागेवरून पवार – विखे पाटील यांच्यात वाद

सैन्याच्या मागे एकत्रीतपणे उभे राहण्याची गरज – शरद पवार

‘या’ मतदार संघातून प्रिया दत्त लोकसभा निवडणूक लढणार

Leave a Comment