सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करा, ‘या’ नेत्याने केली उद्धव ठाकरेंकडे मागणी

Sushma Andhare
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – सध्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) या हिंदू धर्मियांच्या देव देवतांबद्दल बोलतानाचा व्हिडीओ समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावरून आता वारकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. यामुळे विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी पश्चिम बंगालच्या गंगा सागर येथील समुद्र किनारी उद्धव ठाकरे यांनी सुषमा सुषमा अंधारे (sushma andhare) यांची त्वरित पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे..

काय म्हणाले गणेश महाराज शेटे?
राज्यातील वारकऱ्यांना शपथ देऊन सुषमा अंधारे (sushma andhare) ज्या पक्षात जातील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ दिली आहे. आगामी काळात राज्यातील वारकरी देखील अशी शपथ घेतील असेदेखील गणेश महाराज शेटे म्हणाले आहेत. यामुळे आता येत्या काळात सुषमा अंधारे व वारकरी संघटना यांच्यात संघर्ष निर्माण होऊ शकतो.

याअगोदरदेखील मराठा युवा सेनेने सुषमा अंधारे (sushma andhare) यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. सुषमा अंधारे यांचे हिंदुत्त खोटं आहे. त्यांची पक्षातून हक्कालपट्टी न केल्यास शिवसेना भवनासमोर महाआरती करणार असल्याचा इशारासुद्धा मराठा युवा सेनेकडून देण्यात आला आहे.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या