मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके सापडल्या प्रकरणी; आदित्य ठाकरे मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रसिद्ध उद्योगपती अंबानी ग्रुपचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या “एंटीलिया” बंगल्याबाहेर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीन असलेली स्पोटके सापडली आहेत. सोबत धमकीचे पत्र देखील सापडले आहे. या सगळ्या प्रकरणावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली आहे. मुंबईतल्या सुरक्षा व्यवस्थेवर त्यांनी चर्चा केली. तब्बल अर्धा तासांपेक्षा अधिक वेळ त्यांनी पोलिस आयुक्तांबरोबर चर्चा केली.

पोलिसांच्या तपासात बुधवारी रात्री ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केल्याचे समोर आले होते. आता या गाडीबाबत मोठी माहिती पुढे आली आहे. ही गाडी चोरीची असल्याची माहिती आहे. तसंच मुंबई पोलिसांच्या हाती काही महत्त्वाची माहिती लागलीये. याच पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या भेटीला गेले आहेत.

जी गाडी अंबानी यांच्या बंगल्याच्या बाजूला पार्क करण्यात आली होती त्यातून कोणीही बाहेर पडताना सीसीटीव्हीत दिसत नाहीये. गाडीत बसलेली व्यक्ती ही ड्रायव्हरच्या बाजूने न उतरता गाडीच्या आतूनच मागच्या सीटवर गेली आणि तिथून फुटपाथच्या बाजूला उतरल्याने सीसीटीव्हीत सदर व्यक्ती दिसू शकली नाही. सदर व्यक्ती जवळपास दिड तास गाडीतच बसून होता,अशी देखील माहिती समोर येतेय.

गाडी पार्क केल्यापासून सकाळपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केले असून त्याची पडताळणी केली जातीय. गाडीतील व्यक्ती ही मागच्या सीटवरून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या फुटपाथवर उतरली आणि झुकत – झुकत पुढे निघून गेल्याने पोलिसांच्या तपासात अडचणी निर्माण होत आहे. चेहऱ्यावर मास्क आणि टोपी असल्याने सदर व्यक्तीची ओळख सापडत नसल्याची मुंबई पोलिसांची माहिती आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.