धक्कादायक ! महाराष्ट्रातील ‘या’ गावी सापडला बेसुमार स्फोटकांचा साठा

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली । प्रतिनिधी
तासगाव तालुक्यातील सावळज येथे प्रमाणापेक्षा जास्त बेकायदा विस्फोटकांचा साठा केल्याप्रकरणी तासगाव पोलिसांनी छापा टाकला. छाप्यामध्ये ५८७ जिलेटीनच्या कांडया, ४४७ डिटोनेटर्स व एक ट्रैक्टर ३ लाख १२ हजार १४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी राजस्थान येथील रतनलाल गुजर सह एक साथीदार अशा दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती डीवायएसपी अशोक बनकर व पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.

पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी लोकसभा निवडणूक आचारसंहिता अनुषंगाने अवैध्य धंदयावर कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांची गोपनीय माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याचे काम सुरु आहे.

सावळज येथे सावळज ते डोंगरसोनी जाणारे रोड लगत असणाऱ्या एका खोलीत रतन लाल लालुराम गुजर हा जिलेटीन कांड्या व त्याचा ट्रॅक्टर ने बेकायदाशीर बाळगून असल्याची बातमी मिळाली. माहितीच्या आधारे बुधवारी दुपारी छापा टाकला असता विविध कंपनीच्या ६४४४ रुपये किमतीच्या ४८७ जिलेटिनच्या कांड्या व ४४७० रुपये किमतीचे ४४७ डिटोनेटर्स असा ३ लाख १३ हजार १४ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत सहाययक पोलीस निरीक्षक उमेश दंडिले, पोलीस हेड कॉन्स्टेबल काका रुपनर, पोलीस नाईक, रमेश चव्हाण, दरिबा बंडगर, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ गुंडे, विनोद सकटे, सतिश खोत, अशोक सुर्यवंशी, महेश निकम, विजय पाटील यांनी सहभाग घेतला.