परराष्ट्र मंत्र्यांनी दाखल केली ‘या’ राज्यातून राज्यसभेची उमेदवारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | परराष्ट्र मंत्री म्हणून निवड झालेले भारतीय प्रशासकीय सेवेचे माजी अधिकारी आणि परराष्ट्र सचिव म्हणून काम केलेले सुब्रमण्यम जयशंकर यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांनी आपली उमेदवारी गुजरात मधून दाखल केली आहे. त्यांची उमेदवारी दाखल करते वेळी त्यांच्या सोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी देखील उपस्थितीत होते. याच वेळी राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी भाजपकडून जुगुलजी ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

 

परराष्ट्र मंत्री म्हणून शपथ घेतलेली सुब्रमण्यम जयशंकर हे कोणत्याच सभागृहाचे सदस्य नव्हते. भारतीय राज्यघटनेतील तरतुदी नुसार एकदा व्यक्ती जर राज्यसभा अथवा लोकसभेचा सदस्य नसेल तर त्याला पुढील ६ महिन्यात दोन्ही पैकी एका सभागृहाचे सदस्य व्हावे लागते अन्यथा त्याला आपल्या मंत्री पदापासून दूर व्हावे लागते. त्यामुळेच सुब्रमण्यम जयशंकर यांचे मंत्रीपद टिकवण्यासाठी भाजपने त्यांना गुजरात मधून राज्यसभेची संधी दिली आहे.

सुब्रमण्यम जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्रालयात अधिकारी म्हणून बरीच वर्ष काम केले आहे. त्यामुळे त्यांचे काम नरेंद्र मोदी यांच्या मनात भरले. सबब त्यांना आता परराष्ट्र मंत्री म्हणून बढती देण्यात आली आली आहे. सुब्रमण्यम जयशंकर हे परराष्ट्र खात्यात अधिकारी असताना परराष्ट्र व्यवहारात त्यांनी आपले नैपुन्य दाखवून सर्वानाच अवाक केले आहे. म्हणूनच मोदींनी त्यांना आपल्या मंत्री मंडळात स्थान दिले आहे.

Leave a Comment