संजय राऊतांना धक्का; जितेंद्र नवलानी प्रकरणाची एसआयटी चौकशी बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील व्यावसायिक जितेंद्र नवलानी हा ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून बिल्डरांकडून वसुली रॅकेट चालवत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान नवलानी यांची एसआयटी चौकशी बंद करण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली. त्यामुळे राज्य सरकारने राऊतांना एकप्रकारे धक्का दिलेला आहे.

जितेंद्र नवलानी हे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप सुरुवातीपासून होत होता. दरम्यान सण 2015 ते 2021 दरम्यान नवलानी यांनी ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करत जवळपास 58.96 कोटी खंडणी म्हणून वसूल केल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. या आरोपांची चौकशी करण्याकरिता मुंबई पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. या प्रकरणात अँटी करप्शन ब्युरोनेही मे महिन्यात गुन्हा दाखल केला होता. एसबीकडून जितेंद्र नवलानीविरोधात लूक आउट नोटीस जारी केली होती.

त्यानंतर बुधवारी मुंबई हायकोर्टात न्या. नितीन जमादार आणि न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी पार पडली. त्यावेळी सरकारी वकील अॅड. अरुणा पै यांनी एसआयटी चौकशी बंद करण्यात आली असल्याची माहिती दिली.

Leave a Comment