हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फेसबुकचे गुगल फोटो ट्रान्सफर टूल आता जागतिक स्तरावरील प्रत्येकासाठी उपलब्ध झाले आहे. २०१८ मध्ये सुरुवात केल्या गेलेल्या या कार्यक्रमामध्ये फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, गूगल आणि ट्विटर यांचा देखील समावेश होता. हे टूल युझर्सचे आपल्या फेसबुक अकाउंटवरील सर्व फोटो तसेच व्हिडिओंच्या कॉपी तयार करते आणि त्या लिंक केलेल्या गुगल फोटोजमध्ये ट्रान्सफर करण्यास परवानगी देते. युझर्सना एका सर्व्हिसकडून दुसर्या सर्व्हिसमध्ये सहजपणे आपला डेटा ट्रान्सफर करता यावा यासाठीची कल्पना आहे.
“आता युझर्स आपल्या Your Facebook Information या फेसबुकच्या सेटिंग्जमध्ये हे नवीन टूल अॅकसिस करू शकतात आणि इथेच आपण आपली सर्व माहिती देखील डाउनलोड देखील करू शकतात. आपली गोपनीयता आणि सुरक्षितता राखणे हेच आमचे पहिले प्राधान्य असेल आणि म्हणून ट्रान्सफर केलेला सर्व डेटा हा एन्क्रिप्ट केला जाईल आणि त्याचे ट्रान्सफर सुरू होण्यापूर्वी लोकांना त्यांचा पासवर्ड टाकण्यास सांगितले जाईल, ”असे कंपनीने दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
गुगल फोटोमध्ये फेसबुक फोटो आणि व्हिडिओ ट्रान्सफर करण्यासाठी, युझर्सना पहिले आपल्या फेसबुक सेटिंग्जमध्ये “Your Facebook Information” वर जावे लागेल. त्यानंतर ‘Transfer a Copy of Your Photos or Videos’ हा पर्याय निवडा आणि फेसबुक पासवर्ड टाकून आपल्या अकाउंटचे व्हेरिफिकेशन करा. त्यानंतर आपण हे नवीन टूल वापरू शकाल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.