शरद पवारांची फडणवीस -शहांसोबत बैठक?? पहा व्हायरल फोटोमागील खरं सत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे दिल्ली दौऱ्यावर असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अचानकपणे दिल्लीला गेले आणि पुन्हा एकदा राजकीय चर्चाना उधाण आले. सोशल मीडियावर तर पवार- फडणवीस आणि शाह यांचा बैठकीचा एक फोटो जोरदार व्हायरल झाला. पण खरंच पवारांची फडणवीस- शाह सोबत बैठक झाली का??? तर पाहुयात या व्हायरल फोटो मागील सत्य

खर तर या फोटो मधील शरद पवारांनी प्रतिमा हा फोटोशॉप करून लावलेला आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत ट्विट करत आपली भूमिका देखील स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादीने म्हंटल आहे की, अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पाडण्याच्या ‘गजाल्या’ सुरू झाल्यात. त्यासाठी ‘असले’ मॉर्फ केलेले बचकांडे हातखंडे. पण आता मॉर्फला माफी नाही. फसव्या फोटोशॉप जल्पकांचा (ट्रोल्स) शोध घेणं अवघड नाही. महाराष्ट्र सायबर खात्याने असले छुपे छद्मउद्योग करणाऱ्यांना शोधून काढावे ही विनंती.

शरद पवार दिल्लीत –

तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईतील नियोजित कार्यक्रम रद्द करून दिल्लीला रवाना झाले. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल सुद्धा आहेत. दिल्ली दौऱ्यात शरद पवार केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.