हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण भारत सध्या लॉकडाऊन आहे. घरात बसून लोकांचा वेळ चांगला जावा म्हणून सरकारने रामायण, महाभारतासारख्या लोकप्रिय मालिकांचे पुनःप्रक्षेपण दूरदर्शनवर सुरु केलं आहे. यानंतर सोशल मीडियावर गतकाळात दूरदर्शनवर लोकप्रिय असलेल्या बऱ्याच मालिकांचं पुनःप्रक्षेपण सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली. या मागणीत सर्वात आघाडीवर एकाच मालिकेचं नाव होत ते म्हणजे शक्तिमान. त्यामुळं ‘दर्शको कि खास मांग पर’ शक्तिमान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सरकारने याबाबत निर्णय घेतला असून येत्या एप्रिल महिन्यापासून दरोरोज दुपारी १ वाजता शक्तिमान मालिकेचे प्रक्षेपण होणार आहे.
अनेकांच्या बालपणीच्या आठवणींमध्ये दर रविवारी येणाऱ्या शक्तिमान मालिकेची उत्सुकता आजही कायम आहे. भारतचा पहिला सुपर हिरो म्हणून शक्तिमानने प्रत्येक बालमनात आपलं एक अढळ स्थान आहे. त्यामुळं अनेकांना आपल्या बालपणीच्या आठवणीत घेऊन जायला शक्तिमान तयार आहे. शक्तिमानची भूमिका साकारणारे आणि या मालिकेचे निर्माते मुकेश खन्ना यांनी आपल्या मालिकेचे पुनःप्रक्षेपण दूरदर्शनवर करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे आभार मानत आनंद व्यक्त केला आहे.
Doordarshan is all set to telecast Shaktimaan, the famous serial featuring Mukesh Khanna, for 1-hour daily on DD National network from April 2020 at 1 PM: Government of India
— ANI (@ANI) March 30, 2020
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 79726 30753 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.