सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे ।
मिरज तालुक्यातील कदमवाडी येथील संजय कदम या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृतदेहा शेजारी शेतीच्या औषधाची बाटली आढळून आली होती. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली होती. संजय कदम यांची पत्नी जयश्री कदम यांनी माझे पती सावकारीच्या जाचातून त्यांनी औषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असून अजिज शेख या सावकाराच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
संजय कदम यांची पत्नी श्रीमती जयश्री कदम यांनी अजिज शेख यांच्या विरोधात सावकारी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झाला आहे. अजित शेख हा सावकारी व्यवसाय करीत असून अनेक ठिकाणी अशा पध्दतीने अनेकांची लुबाडणूक केली असल्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत. त्याच्या विरोधात सांगलीमध्येही गुन्हा दाखल झाला आहे.
कोरोनाचे संकट देशभरात असताना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सावकारीतून पैसे देवून त्यांची जमीन बळकविण्याऱ्या सावकाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे. सावकारीतून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याला शासनाने आर्थिक मदत दिली पाहिजे. सावकाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी मागणी मिरज पंचायत समिती सदस्य अनिल आमटवणे यांनी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.