जालना प्रतिनिधी | भाजप किसान आघाडीच्या जिल्हाध्यक्षाने एका शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण करत त्यांना खड्डयात टाकून जेसीबीच्या साहाय्याने बुजवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. भाजप कार्यकारणीची शहरात बैठक सुरु असताना सदर प्रकार घडल्याने एकाच खळबळ उडाली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, निवडुंगा येथील शेतकरी ज्ञानेश्वर खांडेभारड यांच्या शेतात विहिरी खोदण्यासाठी भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब भवर यांनी जेसीबी मशीन आणला होता. आपल्या शेतात अचानकपणे जेसीबी मशीन आणल्यामुळे खांडेभारड कुटुंबाने त्यांना विरोध केला. त्यामुळे भवर आणि त्यांच्या समर्थकांनी खांडेभारड कुटुंबातील महिलांसह या कुटुंबाला जबर मारहाण केली. तसेच भवर यांनी यावेळी खांडेभारड यांच्या कुटुबियांना खड्य्यात टाकून मुजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ज्ञानेश्वर खांडेभारड यांनी केला आहे. सदरील घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून यामुळे भाजप अडचणीत आले आहे.
या घटनेनंतर खांडेभारड कुटुंबांनी पोलिसांत धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. जालन्यात भाजपची कार्यकारिणी आयोजित करण्यात आली आहे. या कार्यकारिणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच वरीष्ठ नेते हजर आहे.
इतर महत्वाचे –
गायब झालेल्या मुख्यमंत्र्यांना शोधत आम्ही पुण्यात पोहोचलोय, राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल
अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष वापरतात ती जगातील सर्वांत महागडी गाडी या मराठी माणसाच्या दारात
पती करतात ‘या’ ५ कारणांमुळे पत्नीवर संशय
ट्रायल रुममधे विदेशी तरुणीसोबत अश्लील चाळे
धक्कादायक! नराधमांनी केला चक्क कुत्र्यावरतीच बलात्कार