अमरावतीमध्ये परतवाडा-बहिरम मार्गावर इनोव्हा आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात

accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-बहिरम मार्गावर रात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. दुचाकी आणि कार यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला होता. इनोव्हा कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या या अपघातात बहिरम येथील तिघांचा तर बोधड येथील तिघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या मध्ये इनोव्हा कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. या अपघातानंतर परतवाडा बहिरम मार्गावरची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती.

नेमका कसा झाला अपघात ?
दोघे जण बाईकवरुन गावी जायला निघाले होते. त्यावेळी भरधाव इनोव्हा कारने मागून या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार तरुण पुलावरुन थेट खाली फेकला गेला. या तरुणाचा जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर इनोव्हा कार चालकाचे देखील गाडीवरील नियंत्रण सुटले. या अपघातात इनोव्हा गाडीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता.

या अपघातातील जखमी आणि मृतांची नावे
संजय गजानन गायन हा तरुण या अपघातात जखमी झाला आहे. तर पांडुरंग रघुनाथ शनवारे, सतीश सुखदेव शनवारे, सुरेश विठ्ठल निर्मळे, रमेश धुर्वे, प्रतीक दिनेशराव मांडवकर, अक्षय सुभाष देशकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?