हृदयद्रावक ! एकाच दिवशी मायलेकी झाल्या विधवा

Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर जिल्ह्यातील हिरापूर याठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सासऱ्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना झालेल्या अपघातात जावयाचासुद्धा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी सासरे आणि जावयाचा मृत्यू झाल्याने मायलेकी विधवा झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञान वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

काय आहे प्रकरण
हिरापूर येथील रहिवासी असणारे किसन चिडांम यांचा शनिवारी सायंकाळी शेतावर काम करताना अचानक मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृत किसन चिडांम यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर नातेवाईक गावातील एक पिकअप वाहन भाड्याने घेऊन किसन यांचा मृतदेह चिमूर याठिकाणी घेऊन जात होते.

या दरम्यान चिमूर कानपा महामार्गावरून जात असताना शंकरपूर याठिकाणी त्यांच्या वाहनाला एका अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये चालकासह वाहनातील सहा जण गंभीर जखमी झाले होते. यानंतर स्थानिक लोकांनी त्यांना त्वरित ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर रविवारी पहाटे चारच्या सुमारास जावई शंकर गोमा खंडाते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यानंतर बाकी जखमी रुग्णांना रविवारी सकाळी पुढील उपचारासाठी चंद्रपूर याठिकाणी हलवण्यात आले. एकाच दिवशी सासरे आणि जावयाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.