धक्कादायक ! जन्मदात्या पित्याने 6 वर्षाच्या चिमुकलीला मारून लपवला मृतदेह, अशा प्रकारे झाला खुलासा

murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

माद्रिद : वृत्तसंस्था – माद्रिद या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका पित्याने आपल्या 6 वर्षाच्या चिमुकलीची हत्या करून तिचा मृतदेह जमिनीपासून तब्बल 3000 फुट खाली लपवला आहे. हि मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी तिचा मृतदेह समुद्राच्या तळाशी सापडला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी वडिलांनी काही दिवसांपूर्वी आपल्या दोन अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. त्यामधील मोठ्या मुलीचा मृतदेह सापडला आहे तर धाकट्या मुलीचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हि घटना स्पेन देशातील टेनेरिफ या ठिकाणची आहे. आरोपी वडिलांचे नाव टोमस जिमेनो असे आहे. आरोपी वडिलाने दीड महिन्यापूर्वी आपल्या एक्स बायकोच्या घरातून आपल्या दोन मुलींचे अपहरण केले होते. शुक्रवारी समुद्रात 3000 फुट खाली 6 वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मोठ्या मुलीचा मृतदेह सापडला पण अजून छोट्या मुलीचा काहीच ठावठिकाणा लागला नाही आहे. आरोपी वडिलांनी दुसऱ्या मुलीचीही हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रोबोटने शोधून काढला मृतदेह
वडिलांनी सहा वर्षीय चिमुकलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह एका स्पोर्ट बॅगमध्ये भरून अँकरच्या मदतीने मृतदेहाची ही बॅग 3000 फुट खाली समुद्रात बांधून ठेवण्यात आली. ज्यामुळे घटनेच्या दीड महिन्यानंतरही मृतदेह तरंगत वर आला नाही. दरम्यान एका रोबोटने हा मृतदेह शोधून काढला आहे. हा रोबोट समुद्राच्या तळाला एका बुडलेल्या जहाजाचे अवशेष शोधत होता. मृत मुलीच्या आईने दीड महिन्यांपूर्वी दोन्ही मुली बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. या दोन्ही मुली 27 एप्रिलपासून बेपत्ता होत्या. तसेच पीडित महिलेचा एक्स पार्टनरदेखील त्या दिवसांपासून बेपत्ता होता. सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर आता पोलिसांकडून एक वर्षाच्या एन्नाचा शोध घेण्यात येत आहे. लोकांकडून या नराधम बापावर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.