धक्कादायक! 14 महिन्यांच्या मुलीला रेल्वेत सोडून नराधम पित्याने रचला अपहरणाचा कट

kidnaped
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नागपूरमध्ये बाप आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये नराधम बापाने स्वतःच्या 14 महिन्यांच्या मुलीला रेल्वेत सोडून अपहरणाचा (kidnaped) कट रचला. हि धक्कादायक घटना उघडकीस येताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कृष्णकुमार राजकुमार कोसले असे आरोपी नराधम बापाचे नाव आहे. त्याने नागपूर रेल्वे स्थानकावर आईचे लक्ष नसताना मुलीला जबलपूर-अमरावती एक्सप्रेसमध्ये बसवले. यानंतर आरोपी पत्नीसह चेन्नई-रायपूर प्रवास करत होता. त्याने नागपूर रेल्वे स्थानकावर थांबला असताना हा अपहरणाचा (kidnaped) कट रचल्याचे पोलीस तपासात सांगितले आहे. पोलीस सध्या त्या लहान मुलीचा शोध घेत आहेत.

60 लाखांचे दागिने घेऊन चोरटा निघाला विदेशात…
नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी शांती नगर पोलीस स्टेशन हद्दीत 73 लाख रुपयांची चोरी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत जाफर जावेद थारा आणि वाजीद वल्द गफ्फुर अली या दोघांना अटक केली आहे. या दोघांनी मिळून 13 लाख रुपये रोख आणि सोन्याच्या दागिन्यांसह 60 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला होता.पोलिसांनी हा सगळा मुद्देमाल जप्त करून या दोघांना अटक केली आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!