हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : गुंतवणुकीच्या पर्यांयांमध्ये एफडी सर्वांत लोकप्रिय मानली जाते. सहसा लोकांकडून फक्त बँकांच्या एफडीमध्येच पैसे गुंतवले जातात कारण अनेकांना हे माहिती नसते की अनेक कंपन्या देखील फिक्स्ड डिपॉझिट्सची सुविधा देतात. प्रेशर कुकर बनवणारी हॉकिन्स कुकर लिमिटेड ही देखील अशीच एक कंपनी आहे, जिच्याकडून तीन कालावधीसाठी एफडीची ऑफर दिली जाते. मात्र हे इथे लक्षात घ्या की, या कंपन्यांकडून मोठ्या कालावधीसाठी एफडीची ऑफर दिली जात नाही, मात्र कमी कालावधीत या जास्त रिटर्न देतात. FD Rates
हॉकिन्स प्रेशर कुकर लिमिटेड कडून 13 महिन्यांच्या एफडीवर 7.5 टक्के, 24 महिन्यांच्या एफडीवर 7.75 टक्के आणि 36 महिन्यांच्या एफडीवर 8 टक्के रिटर्न मिळतो. कंपनीकडून देण्यात आलेल्या या नवीन FD मध्ये आपल्याला किमान 25 हजार रुपयांची गुंतवणूक लागेल. याशिवाय, व्याजासाठी 2 पर्याय मिळतील. यातील पहिला सहामाही प्लॅन आणि दुसरा कम्युलेटिव्ह प्लॅन. सहामाही प्लॅनमध्ये वर्षातून दोनदा व्याज दिले जाईल. तर कम्युलेटिव्ह प्लॅनमध्ये FD च्या मुदतीच्या समाप्तीवर एकरकमी व्याज मिळेल. हे लक्षात ठेवा कि, यामध्ये FD व्याजाद्वारे एका वर्षात 5,000 रुपयांपेक्षा जास्त नफा झाला तर त्यावर TDS कापला जाईल. FD Rates
ICRA कडून या FD ला AA म्हणजेच स्थिर रेटिंग देण्यात आले आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून हे रेटिंग कायम आहे. हॉकिन्स कुकरकडून एफडीवरील व्याज दर सातत्याने कमी कऱण्यात आले आहेत. 2020 मध्ये, कंपनीकडून 3 वर्षांच्या FD वर 10 टक्के व्याज दिले जात असे जे 2020 मध्ये 9 टक्के झाला. यानंतर 2022 मध्ये ते 8 टक्क्यांवर आले. हे लक्षात घ्या कि, आरबीआयकडून रेपो दरात केलेल्या वाढीचा हॉकिन्स कुकरच्या एफडीवर परिणाम झालेला नाही. एकीकडे अनेक बँकांनी एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत. मात्र असे असूनही, हॉकिन्स कुकरच्या एफडीवरील दर बँक एफडीपेक्षा खूपच चांगले आहेत. FD Rates
SBI कडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी डिपॉझिट्स असलेल्या FD वर सामान्य लोकांना 5.65 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 6.45 टक्के व्याज मिळते. त्याच वेळी PNB सामान्य लोकांना जास्तीत जास्त 6.25 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 6.45 टक्के व्याज देते. एचडीएफसी बँकेकडून सामान्य लोकांना जास्तीत जास्त 6.10 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 6.60 टक्के व्याज दिले जाते. त्याच वेळी ICICI बँक सध्या FD वर जास्तीत जास्त 6.05 टक्के व्याज देत आहे. FD Rates
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hawkinscookers.com/Fixed_Deposit_Scheme_Menu_2021.aspx
हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये केली 290 पट वाढ
Post Office च्या योजनेमध्ये फक्त 299 रुपयांमध्ये मिळेल 10 लाखांचा विमा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये घसरण, आजचे नवे दर पहा !!!
Multibagger Stock : ‘या’ केमिकल फार्मा कंपनीने गुंतवणूकदारांना बनवले कोट्याधीश
Personal Loan साठी अर्ज करण्यापूर्वी ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा !!!