७ दिवसांत आयुर्वेदाच्या मदतीने कोरोना पेशंटला बरे केल्याचा योगगुरू बाबा रामदेव यांचा दावा जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योगगुरू रामदेव यांनी पतंजली योगपीठाच्या वतीने केंद्र सरकारला २५ कोटींचे योगदान दिले. बाबा रामदेव म्हणाले की पतंजलीवर जर काही जबाबदारी आली तर ते ती पार पाडतील.बाबा रामदेव यांनी सांगितले की, सर्व पतंजली कर्मचारी त्यांचे एक दिवसाचे पगार पंतप्रधान यांना देणार आहेत. हे दीड कोटी पीएम रिलीफ फंडामध्येही जाईल. बाबा रामदेव यांनी पतंजलीशी संबंधित भाविकांना पंतप्रधान मदतनिधीसाठी देणग्यांसाठी पुढे यावे असे आवाहनही केले आहे.

यावेळी बाबा रामदेव यांनी हे देखील सांगितले की आयुर्वेद अ‍ॅलोपॅथीपेक्षा कमी नाही, म्हणून आम्हाला काही रूग्ण उपलब्ध करायच्या आहेत जेणेकरुन आपण आयुर्वेद पद्धतीने लोकांवर उपचार करू शकू. बाबा राम देव म्हणाले की, आमचा एक मुलगा प्रयागराज यूपी येथे होता आणि अनवधानाने त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता,तो ७ दिवसांत आयुर्वेदिक औषधोपचाराने बरा झाला.

बाबा रामदेव म्हणाले की, अश्वगंधा आणि गिलोयच्या सेवनाने कोरोना विषाणू बरा होत असंल्याचे पतंजली संशोधन केंद्राने संशोधन केले आहे.

रामदेव म्हणाले की, हरिद्वार, दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी आणि हिमाचलमध्ये अशी आश्रमशाळे आहेत ज्यांचा उपयोग कोरोनासंक्रमित रुग्णांच्या आइसोलेशन वार्ड म्हणून करता येईल. तेथे दीड हजाराहून अधिक बेड्स आहेत, खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीसाठी आम्ही या ५ संस्था पुरविण्यास सक्षम आहोत.

बाबा रामदेव म्हणाले की, जर आपण एकत्र लढलो नाही तर आपल्याकडे इटली, स्पेन आणि इराण सारखीच स्थिती असेल. म्हणून गंभीरपणे संघर्ष करणे आवश्यक आहे. रामदेव म्हणाले की आमच्याकडे लाखो कामगार आहेत जे रुग्णांची सेवा करण्यास तयार आहेत, आम्ही पंतप्रधानांना ही ऑफर दिली आहे. रामदेव म्हणाले की आमची पतंजली रुग्णालये देखील उपस्थित आहेत, त्याशिवाय ते स्वतःदेखील सर्व देशवासियांना मानसिक, शारीरिक, भावनिक बळकटीसाठी योग शिकवत आहेत जेणेकरून व्यायामशाळेत न जाता लोक निरोगी राहू शकतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

Leave a Comment