हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राऊत यांच्या धमक्यांमुळे बंडखोर शिवसेना आमदार भितीपोटी गुवाहाटी येथे तळ ठोकून आहेत. सध्या राज्यातील एकूण राजकीय वातावरण आणि शिवसेनेवर आलेलं संकट या पार्श्वभूमीवर पक्षाचे कार्यकर्ते राज्याच्या विविध भागात आंदोलन करत आहेत. तर अनेक ठिकाणी हिंसाचार होत आहे अस याचिकेत म्हंटल आहे.
शिवसैनिक अनेक ठिकाणी हिंसाचार आणि दंगली करत आहेत. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत आहे . यामुळे कोणताही प्रकार घडल्यास त्याला हे तीन नेते जबाबदार असतील.त्यामुळे उद्धव, आदित्य आणि संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशी मागणी करण्यात आली आहे अस याचिकेत म्हंटल आहे.
येवडच नव्हे तर बंडखोर आमदारांचे मृतदेह मुंबईत येतील आणि शवविच्छेदनासाठी ते थेट शवागृहात पाठवले जातील, अशी धमकी संजय राऊत यांनी दिली आहे. अशाप्रकारे धमक्या देऊन, शिवसैनिकांना बंडखोर आमदारांविरोधात आंदोलने करण्यास प्रवृत्त करून हे तीनही नेते महाराष्ट्रात दंगल व हिंसाचाराची परिस्थिती निर्माण करत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.