सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावर शुक्रवारी हल्ला करण्यात आला. करण्यात आलेला हल्ला हा नियोजित कट असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी साक्षीदार शोधण्यासोबत पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून पोलीसांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavrte) यांनाही अटक केली आहे.
दरम्यान आता सातारा पोलीस ठाण्यात मराठा आरक्षण संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदावर्ते यांना ताब्यात घेणयासाठी सातारा पोलिसही कोर्टात दाखल झाली आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दीड वर्षांपूर्वी मराठा आरक्षण प्रकरणात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी एक गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी सातारा पोलीस अधिकारी भगवान निंबाळकर हे पोलिस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले आहेत. Gunaratna Sadavrte
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने एका वृत्तवाहिनीवर सदावर्ते यांनी बेताल वक्तव्य केले होते. तेढ निर्माण होईल असे वक्तव्य झाल्याने याप्रकरणी एका तक्रारदाराने शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी सातारा पोलीस अधिकारी मुंबईतील गिरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.