प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल

pravin darekar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंबई येथील फोर्टच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान काल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनातही दरेकर यांच्याबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले होते. त्यानंतर आज दरेकर यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंब्रा बँकेतील निवडणुकीच्यावेळी प्रवीण दरेकर यांनी प्रतिज्ञापत्रात स्वतः मजूर असल्याची माहिती दिली होती. या प्रकरणी आज भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलानंतर दरेकर यांच्याकडून आज न्यायालयात दाद मागितली जाणार आहे.