हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळून आला होता. त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. त्याच्या मृत्यूने बॉलिवूड निर्माता विजय शेखर गुप्ता प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी सुशांतच्या आयुष्यावर एक सिनेमा ‘सुसाईडऑरमर्डर’ करण्याची तयारी सुरु केली आहे. त्याचे पोस्टरही त्यांनी प्रदर्शित केले असल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सांगितले. मुंबई सिनेक्षेत्रात काही मोठे तारे आणि प्रोडक्शन हाऊस यांची जी एकाधिकारशाही आहे त्याला उघडे करण्यासाठी हा सिनेमा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
बाहेरून येणाऱ्या आणि गुणवत्ता असणाऱ्या तरुणांना सिनेक्षेत्रातील समूहांमुळे संधी मिळत नाही. मला या समूहांना तोडायचे आहे. सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले गेले आहे जे मी या आहे. बॉलीवूडला पूर्णतः निर्वस्त्र करणार आहे असे ते यावेळी म्हणाले. त्याला एकामागोमाग एक सिनेमांमधून सातत्याने काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सुशांतसोबत त्याच्या सारख्याच मानसिकतेतून जाणाऱ्या काही इतर अभिनेत्यांची माहिती देखील या सिनेमात असेल असे सांगत माझी एक टीम वेगाने या विषयावर संशोधन करत आहे असे ते म्हणाले.
त्यांनी या सिनेमासंदर्भात त्यांचा कायदेविषयक टीमसोबत बोलणे झाल्याचे सांगितले जेणेकरून कोणत्याच प्रकारचा अडथळा येणार नाही. याला कोणता चरित्रात्मक सिनेमा न बनवता सुशांतच्या आयुष्यावरून प्रेरित होऊन बॉलिवूड मधील सत्य लोकांसमोर आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. बॉलिवूड कुणाच्या वडिलांच्या मालकीचे नाही. त्याच्यावर सर्वांचा समान अधिकार आहे. एखादा लायक तरुण अभिनेता ज्यापद्धतीने या लोकांमुळे निराशेच्या गर्तेत जातो ते पूर्णतः चुकीचे आहे. असेही ते म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”