हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 2023 : आज (1 फेब्रुवारी रोजी) देशाचा सर्वसाधारण Budget 2023 सादर केला गेला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. अशा परिस्थितीत निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्री म्हणून आपला सलग पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. आपल्या चार केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी आपले सर्वात छोटे अर्थसंकल्पीय भाषण केले. अर्थमंत्र्यांनी 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचे अर्थसंकल्पीय भाषण फक्त 87 मिनिटांत केले. गेल्या वर्षी त्यांनी सर्वात कमी वेळेत (92 मिनिटे) अर्थसंकल्प सादर करून विक्रम केला होता.
हे जाणून घ्या कि, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्मला सीतारामन यांचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री म्हणून देशातील आतापर्यंतचे सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण निर्मला सीतारामन यांनीच केले आहे. 2020 मध्ये त्यांनी 2 तास 40 मिनिटांचे अर्थसंकल्पीय भाषण केले. ज्यानंतर 2019 मध्ये त्यांनी आपला स्वतःचाच विक्रम मोडीत काढला.Budget 2023
कोणकोणत्या क्षेत्रांवर सरकारने दिला भर
यावेळीच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांची खास काळजी घेतली गेली आहे. यावेळी तब्ब्ल नऊ वर्षांनंतर टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा आणि कृषी क्षेत्रासाठी देखील मोठ्या भांडवली खर्चाचा देखील समावेश करण्यात आला आहे. Budget 2023
यासोबतच मध्यमवर्गीयांना करसवलतही मिळाली आहे. आता नवीन टॅक्स सिस्टीममध्ये एकूण 5 स्लॅब असतील. त्याचप्रमाणे आता इन्कम टॅक्स मधील सवलतीची मर्यादाही 5 लाखांवरून 7 लाख रुपये करण्यात आली आहे. या नवीन टॅक्स सिस्टीमनुसार आता 0-3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स आकारला जाणार नाही. तसेच 3.6 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% , 6.9 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10%, 9-12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15%, 12-15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20% आणि 15 लाखांपेक्षा जास्तीच्या उत्पन्नावर 30% टॅक्स भरावा लागेल.
अर्थमंत्र्यांनी भाषणांत सांगितले की,”अमृत काळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सर्वसमावेशक सुधारणा आणि ठोस धोरणांवर भर दिला गेला आहे. आता भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे. चालू वर्षासाठी आपला वार्षिक आर्थिक विकास दर 7.0% राहण्याचा अंदाज आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार 10व्या वरून जगातील 5व्या क्रमांकावर पोहोचला आहे.” Budget 2023
2014 पासून सरकारच्या प्रयत्नांमुळे सर्व नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे, असेही अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, ‘कोणीही मागे राहता काम नये’ या मंत्रावर सरकारकडून भर देण्यात आला आहे. आता व्यवसायासाठी अनुकूल वातावरण असलेले सुशासित आणि नाविन्यपूर्ण राष्ट्र म्हणून आपली स्थिती लक्षणीयरीत्या सुधारली गेली आहे. Budget 2023
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://youtube.com/live/uMj699Dopoo
हे पण वाचा :
Railway Budget 2023 : रेल्वेसाठी 2.4 लाख कोटींचे बजट, 2013 च्या अर्थसंकल्पापेक्षा 9 पटींनी जास्त
Share Market : अर्थसंकल्पाचा विमा कंपन्यांना फटका, शेअर्समध्ये झाली 14 टक्क्यांपर्यंतची घसरण
Budget 2023 : आता PF मधून पैसे काढल्यावर द्यावा लागणार कमी TDS, जाणून घ्या कोणाला होणार फायदा
Post Office च्या ‘या’ योजनेमधील डिपॉझिटच्या लिमिटमध्ये झाली वाढ !!!
New Tax Slab vs Old Tax Slab : जुन्या अन् नवीन स्लॅबमध्ये काय फरक आहे??? किती उत्पन्नावर किती टॅक्स द्यावा लागेल ते पहा